जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ७. Communication Skill: संवाद कौशल्य
७. Communication Skill: संवाद कौशल्य
मिटे बाद संवाद तो हितकारी, एका यशस्वी माणसाला सर्वात जास्त कोणत्या कौशल्याची असेल तर ती म्हणजे तो एक उत्कृष्ट संवादी असला पारि मुक्या माणसाने मैनेजर व्हायचं नसतं आणि मॅनेजरने मुकं रहायचं नसतं ग संवाद करण्यासाठी व्यवस्थापकाला हे माहित असलं पाहिजे की काय बोलावे कर बोलावं कोणाशी बोलावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी बोलावं. योग्य गोष्ट चुकीच्या वेळी बोलणं महागातच पडतं आणि तसेच योग्य
माणसा चुकीचं बोलणं आणि चुकीच्या माणसाशी योग्य बोलणं टाळावं म्हणजेच काय तर स्थळ वेळ, काळ प्रसगं, माणूस त्याचा स्वभाव एकंदरीत प्रश्न परिस्थिती लक्षात घेऊन बोलावं तरच ते फायदेशीर ठरतं आणि हे कौशल्य असणारी माणसं जगात खिशात एक रुपयाचं भांडवल नसतानाही प्रचंड यशस्वी झालेली पहायला मिळतात. भुत काळातही वर्तमानातही आणि होय भविष्यातही. जेवढा संवाद अचूक तेवढा तो माणूस यशस्त्री हा त्रिकालाबाधीत नियम असून तो बदलण्याची शक्यता वर्तवणं म्हणजे संवाद कौशल्याची उपेक्षा करण्यासारखंच होईल. महाराजांच्या बाबतीत इतिहास काय सांगली तर महाराज कमी बोलायचे, मुद्याचे बोलायचे आणि विनाकारण बोलायचे हास्यविनोद करण्याचे टाळायचे. खूष मस्कऱ्यापासून लांब रहायचे. महाराजांनी संवाद कौशल्याबाबतची जी आचार संहीता होती ती इथे मी जशीच्या तशी ऐतिहासिक रुपात देत आहे.
राजेलोकी परिमित बोलत जावे. कार्यविरहित हरकोणाशी तरी भलत्याच गोष्टी बोलत बसू नये. असे बोलू लागल्यावर मनुष्य सलगे होऊन अमर्याद होते. राजकारणप्रसंगी, कार्याकार्यविचार, प्राप्तप्रसंगाचे गुणदोष, ज्या लोकांशी बोलणे ते, आधी त्या लोकांचे प्रोत्साहन प्रगल्भपणेच अगत्यागत्य करुन, त्यांजकडूनच बोलवावे. आपण चित्त देऊन ऐकावे.
आपले युक्तीस समर्पक आले तर उत्तम म्हणून मान्य करावें. विचारास त्या लोकांची नजर पावली नसली तर आपण त्यांची अवहेलना न करिता स्फुटवक्तेपणे साहित्य योजून, उतावळी न दर्शविता सावकाशे संपूर्ण कार्यविवंचना गुण ते बोलावे. त्या लोकांचे प्रत्ययास आणून द्यावे. वरकड नित्य कार्य साधारण
सेवकांस सांगणे ते प्रायशः इशारतीनेंच सांगत जावें.
इशारत म्हणून सर्वकाळ नेत्र हस्तपादादि अंगविकार, शरीरचांचल्य सर्वथा न दाखवावे. बसले ठायी स्थाणु किंवा मेरु असा आसनजय बरा अभ्यासावा. राजेलोकी लहान अथवा थोर कोणी एक सेवकाचा दोष मुखे उच्चारीत जाऊ नये. आढळल्यास दुसऱ्याजवळ बोलू नये. आपल्याच चित्तात ठेवून त्याचे परिहाराचा उपाय योजीत जावा.
कोणतेहि एक पडले अंतर धन्यास कळले नाही इतका पडदा आहे तोच बरें. इतक्याने माणूस मर्यादवंत किंबहुना प्रतिकाराविषयीही सावध राहते. त्यामुळे त्याचा प्रतिकार करावयास सुलभ पडते.
आता कळलं असेल महाराज आपल्यासारखे एक सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला येऊनही युगपुरुष, युगनिर्माता का ठरले ते !
ज्याला चांगला संवाद जमतो तोच जग जिंकतो आणि ज्याचा संवाद फसतो तो जिंकलेले जगही गमावतो. म्हणून आपण कामापुरतं, मर्यादीत, आवश्यक असेल तेवढंच आणि योग्य माणसाकडं, योग्य वेळ, काळ पाहून बोलण्याची सवय लावून घ्या. हे नाहीच जमलं तर लक्षात ठेवा चुकीचं बोलून काम बिघडवण्यापेक्षा गप्प राहून काम पुढे ढकललेलं बरं! कारण यामुळे भविष्यात तरी संवाद पुन्हा साधण्यासाठीची शक्यता आणि संधी कायम राहील आणि तेवढ्या मिळालेल्या अवधीत तुम्ही Good Communication Skill शिकून घेतलेलं बरं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

