यशस्वी व्यवस्थापकाने केलीच पाहिजेत अशी कामे

 

सर्वोच्च आणि सर्वात जास्त यशस्वी व्यवस्थापक होऊ इच्छीणाराने केलीच पाहीजेत अशी कामे

ज्याला जगातील सगळ्ळ्यात मोठा आणि यशस्वी व्यवस्थापक व्हायचे असेल त्याने कोणकोणती काम करणे आवश्यक असते त्यावर एक नजर टाकूया.

* १. Mission statement:

ध्येय वाक्याचा पाठपुरवठा करणे, कितीही अवघड, बिकट प्रसंग आला, संकटे आली तरी आपले ध्येय सोडायचे नाही डगमगायचे नाही.

* २. Plan and policies

योजना बनविणे धोरण राबविणे आपले ठरविलेले ध्येय साध्य करण्यासाठी योजना बनवायची आणि योजना अंमलात आणण्यासाठी धोरणे राबवायची. योजना हा ध्येयाकडे जाणारा रस्ता आहे तर धोरणे हे दिशादर्शक Directions आहेत.

* ३. Organising Resources:

साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी योजना बनवायची धोरणे राबवायची आणि त्यासाठी लागणारी सगळी साधनसामग्रीची जुळवाजुळव करायची. यामध्ये man, money, machine, material सगळे काही आले.

* ४. Selection: निवड करणे

आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी लागणारी योग्य माणसे अचूक पणे निवडून त्यांना योग्य ती जबाबदारी द्यायची. Right person to be selected for right job.

* ५. Direction : दिशा देणे

निवडलेल्या माणसांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे. ते ध्येयापासून बाजूला जाऊ नयेत याची काळजी घेणे. थोडक्यात काय तर सहकाऱ्यांची दिशा चूकणार नाही याची दक्षता घेणे.

* ६. Control of Activities: कामावर नियंत्रण

आपले सहकारी काय काम करतात यावर नियंत्रण ठेवून त्यांना नियंत्रीत करणारी व्यवस्था निर्माण करुन त्या व्यवस्थेवर ही नियंत्रण ठेवून प्रत्येकाची कार्यकुशलता वेळोवेळी मोजणे.

* ७. Motivation: प्रोत्साहन देणे

आपल्या सहकाऱ्यांना नुसतं नियंत्रीत करुन काम भागत नसतं तर त्यांना आणखी वेगाने अचूकपणे काम करण्यासाठी प्रवृत्त करणेही महत्वाचे असते. अधिक माहितीसाठी मोटीवेशन प्रकरण वाचा.

* ८ . Reporting: अहवाल

कोणी काय काय काम केल आहे त्याचा अहवाल तयार करणं जेणेकरुन कोणाला प्रमोशन द्यायचे कोणाची बदली करायची आणि कोणाला बडतर्फ करायचे याचा निर्णय घेता येईल अशी व्यवस्था करणं आणि कामकाज सुरळीत योग्य दिशेने चालतं आहे ना याची खात्री करुन आवश्यकता असल्यास काय बदल करावे लागतील हे समजून भविष्यात तसे बदल करणे चांगल्या माणसाचं प्रमोशन कामचुकारांची बदली आणि निष्काळजी लोकांची बडतर्फी ही या तत्वाची त्रिसूत्री.

आता कळलं का शिवाजी महाराजांची राजमुद्रा अष्टकोनी का होती ? ज्याला यशस्वी व्यवस्थापक व्हायचे असेल त्याने अष्टपैलू होणे आवश्यक. अष्टपैलू होण्यासाठी हे आठ गुण आत्मसात करणे म्हणजेच यशस्वी माणूस. यशस्वी व्यवस्थापक यशस्वी उद्योजक होणे.

या आठ तत्वांची जो गाठ बांधतो तोच या जगात ताठ मानेने जगतो आणि जो या आठ तत्वांची गाठ बांधू शकत नाही यश त्याला नेहमी पाठ दाखविल्याशिवाय राहत नाही.

अष्टपैलू व्यक्तीमत्व होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करा. स्टेप बाय स्टेप आपल्या जीवनाचे ध्येय प्लान आणि पॉलीसीस, बाकीची तत्वे आत्मसात करा.

लक्षात ठेवा आपल्या जीवनात काही तरी मिशन असणे हेच आपण यशस्वी होण्याचं प्रमुख रिझन असतं, कारण असतं. ज्यांच्या जीवनात ध्येय असते ते ध्येयासाठी, प्राप्तीसाठीच जगतात. ध्येय नसणारे लोक जीवंतपणीच मेलेले असतात.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!