एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी काही कौशल्य त्याच्या अंगात असणे किंवा त्यानी ती प्रयत्नपूर्वक राबविणे आवश्यक असते. या वैगवेगळ्या कौशल्याच्या जोरावरच तो व्यवस्थापक जगातील सर्वात उत्कृष्ट व्यवस्थापक होऊ शकतो. याला Management skill असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे –
* Concept skills: संकल्पना कौशल्य
एखाद्या व्यक्तीला जगात यशस्वी व्हायचे असेल आणि तेही कमीत कमी वेळात कदाचित कमीत कमी श्रमात तर त्या व्यक्तीकडे एक प्रमुख कौशल्य असायला हवे आणि ते म्हणजे संकल्पना कौशल्य. संकल्पना कौशल्य म्हणजे स्वप्न पाहणे नव्हे संकल्पना कौशल्य म्हणजे आपल्या बुद्धीच्या जोरावर भविष्याचा वेध घेऊन पुढे नवीन काय संकल्पना आकाराला येतील याचा अंदाज घेणे. भविष्यात काय होईल याचा आज तुम्ही अंदाज घेऊन लगेच निर्णय घेणे यासाठी तुम्हाला दूरदृष्टी असायला हवी. Vision म्हणतात तो शब्द येथे अचूकपणे लागू होतो. जे Vision ठेवतात ते भविष्याचा वेध घेतात आणि ज्यांच्याकडे ते नसते त्यांच्या अपयशाचे पराभवाचे दुसरे काही कारण नसते. काळाची पाऊले ओळखून त्याप्रमाणे आपल्या दिशा ठरविणे हेच मूळी यशस्वी माणसाचे लक्षण आहे.
जो जेवढा द्रष्टा तो तेवढा यशस्वी होतो हे लक्षात असू द्या. त्याच्या यशाचे गमकच मुळी द्रष्टेपणात आहे. ३०० वर्षात कोणालाही स्वराज्याची संकल्पना स्वप्नातही सुचत नव्हती तेव्हा महाराज ही संकल्पना उराशी बाळगून तिला आकार देत होते आणि त्या दिशेने नेटाने प्रयत्न केले. निश्चयकारक बुद्धी ठेवली म्हणून स्वराज्य नावाची संकल्पना महाराजांनी राबविली आणि जगात Grand Rebel म्हणून नाव कमावले, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्र बंड करणे म्हणजे मृत्यूलाच, सर्वनाशालाच आमंत्रण हे समीकरण असताना महारा। स्वातंत्र्याचं स्फुलींग पेटवतात आणि स्वाभिमानी कर्तबगार माणसे गोळा करुन एक नवीन संकल्पना अंमलात आणतात. ३०० वर्षे या देशात मोगलांनी राज्य केलं पण एकाही शासकाला आपण स्वतःचे आरमार उभारावे असे स्वप्नातही वाटले नाही आणि तेच महाराज वयाच्या २७ व्या वर्षी द्रष्टेपणाने आरमार उभारणी करुन या देशाची पहिली स्वतंत्र आरमाराची स्थापना करुन एक द्रष्टा शासक म्हणून आपत्रं नाव देशाच्या आरमार उभारणीच्या क्षेत्रात कोरुन गेले कसलेही प्रगत तंत्रज्ञान जगात उपलब्ध नसताना आपली कामकाजे विजेच्या वेगाने व्हावीत यासाठी महाराजांनी १६ व्या शतकात आग, धूर, प्रकाश, ध्वनी अशा माध्यमांचा त्वरीत संपर्क यंत्रणा म्हणून केलेला उपयोगही Vision मध्ये मोडतो, आणि म्हणूनच जगात ज्याच्याकडे जेवढा द्रष्टेपणा तेवढ़ा तो मोठा किंवा यशस्वी होतो हे महाराजानी सिद्ध करुन दाखविले.
संकल्पना कौशल्याचा आणखी एक फायदा होतो तो असा की जो भविष्याचा वैच घेतो तो येणाऱ्या प्रश्नाची, अडीअडचणींची एक यादी तयार करुन त्या संभवित अडथळ्यांवर मात करणाच्या उपाय योजना राबवून आपली संकल्पना आणि मार्ग यातील अडथळे दूर करून प्रवास बिनधोक करतो. येणाऱ्या संभवित प्रश्नांची अडचणीची अगोदरच व्यवस्था केलेली असल्यामुळे शक्यतो वाटचालीतील अडथळ दूर होतो. तहान लागल्यावर विहिर खोदायची कल्पना तर मुर्खालाही असते. परंतु पाऊस पडत असतानाही जो विहीर खोदण्याचे काम करतो त्याला जरी त्यावेळी जगाने मूर्ख म्हटले तरी तोच माणूस पावसाळा संपल्यापासून शहाणा असल्याचे सिद्ध होत असते. कारण त्याने पावसाळ्यानंतर पाण्याची निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन म्हणजेच दूरदृष्टी ठेवून ती विहीर, तलाव, धरण, तळे बांधायला घेतलेले असते. ही दूरदृष्टी म्हणजे विमान उडण्याच्या अगोदर एक तास विमानतळावर पोहोचण्यासारखे आहे. बैल गेला आणि झोपा केला हे दूरदृष्टी नसल्याचा परीणाम असतो. संकल्पनेचा आराखडा तयार करुन वेध घेण्याची ताकद हेच कुशल व्यवस्थापकाचे सर्वात मोठे कौशल्य होय.
सर्वात टॉपच्या व्यवस्थापकाच्या यशाचे रहस्य आज तुम्हाला कळले तर तुम्हीही सर्वात यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी आतापासून आपला जास्तीत जास्त वेळ नियोजन करण्यासाठी, जुळवाजुळव करण्यासाठी आणि वर्तमानासह भविष्यातील प्रश्नांचा वेध घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करुया.
आठवलं म्हणून तुम्हाला दूरदृष्टीचे एक उदाहरण सांगूनच पुढे जातो. महाराजांची दूरदृष्टी सांगण्याचा मोह मला आवरत नाही असं म्हटले तरी चालेल. कारण तुम्हालाही ती गोष्ट वाचण्याचा मोह आवरता येणार नाही याची मला जाणीव आहे.
त्याच झालं असं महाराजांनी राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण जगभरातील राजांना, सरदारांना, व्यापाऱ्यांना पाठविलं होतं त्यानुसार इंग्रजांचा एक वकील रायगडावर आला होता. नाव तुम्हाला माहित असेल कदाचित हा तोच तो हॉमस निकोलस, इंग्रज माणसं मोठी हुशार आणि चाणाक्ष बरं, पाहुणा म्हणून आला तरी त्याच बारीक लक्ष एका गोष्टीवर कायम आणि ते म्हणजे महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य. काय कस कुठे काम केले आहे ते पाहणे, घराचे वासे मोजणे है काम काही लोकांना खूप चांगले जमते. आपण कुठे पाहुणे म्हणून गेलो तर आपलं पहिलं लक्ष असते खाण्याकडे आणि हुशार माणसांच लक्ष असतं नवीन नवीन गोष्टी पाहण्याकडे त्या वस्तू समजून घेण्याकडे म्हणजेच काहीतरी नवीन शिकायला मिळते का ते पाहण्याकडे, तसे हा टॉमस रायगडावर आल्यावर जेव्हापासून किल्ल्यावर मोठमोठे चार हत्ती पाहिल्यापासून विबाराच्या महासागरात गटांगळ्या खात होता, मी ज्या वाटेने महादरवाज्याने आलो त्या वाटेने माणसाला नीट येता येत नाही मोकळा घोडा लगाम हातात धरुन गडावर आणायचा म्हटला तरी अवघड. तेथे या छोट्या अरुंद वाटेने महाराजांनी एवढे मोठे मोठे हत्ती गडावर कसे आणि कोठून आणले असतील. विमानाने कि क्रेनने ? अरे त्या काळात विमान आणि महाकाय क्रेन नव्हत्या म्हणूनच तो विचारात पडला होता ना की हत्ती वर आणले कसे ?
इंग्रज माणूस मी हे कसं कोणाला विचारु असा विचार करुन आपली जिज्ञासा कधीच मारत नसतो आणि आपली माणसे साधा नवीन विभागात गेला तर पत्ता विचारायला लाजतात आणि तासभर स्वबळावर पन्नास फुटांवर असलेला पत्ता शोधत बसतात. दूरदृष्टी नसेल तर धूरदृष्टीचा हा परीणाम असतो. लाज वाटते, वाटणे नावाचा नको तो धूर आमच्या डोळ्यावर नेहमी जमाच झालेला असतो. असो, लोकांना जग जिंकायची पडलेली असते तेव्हा आम्हाला दोन वेळच्या पोटाची पडलेली असते कारण तेच की दूरदृष्टी नाही.
तर आपला तो टॉमस यांच्या डोक्यातून हा प्रश्न काही उत्तर घेतल्याशिवाय जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने तो प्रश्न महाराजांच्या मंत्र्याला विचारून पाहिला. मंत्र्याने सांगितले ते आमचे Trade secret आहे. व्यवसायिक गुपीते कोणाला सांगायची नसतात. बाकी विचारा. तर तो म्हणे बाकी काही नाही बाकीचं मी सगळ स्वतःच समजू शकतो, समजलो ही आहे आणि जे समजू शकत नाही तेवढंच मात्र तुम्हाला विचारतो आहे. आणि तुम्ही अगदी चलाखीने सांगताय बाकी विचारा. अरे आपला मराठी माणूसच लय भारी हुशार त्याला असं विचारायची सवयच लागली तेव्हापासून बाकी काय! बाकीचं बोला.
प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा बेचैनच होता आणि मग त्याने निश्चय करून ठरवलंच की आपण हा प्रश्न ज्याने सोडवला त्या दृष्ट्या माणसालाच विचारु बाकी काय। आणि खरोखरच त्या हिंमत बहाद्दराने मोठ्या हिंमतीने नव्हे तर खुबीने महाराजांनी जेव्हा पाहुण्यांना प्रीती भोजनासाठी बोलावले तेव्हाच हा प्रश्न विचारला. कारण स्पष्ट होते जेवताना माणूस खुश असतो. आणी आनंदाच्या भरात पटकन उत्तर देऊन जातो म्हणून तर लोक Business party व्यवसायिक कार्यक्रम खाण्यापिण्यापासून जय्यत तयारीनिशी असतो बरं. भरल्यापोटी डोके पटकन चालतं आणि जीभही पटकन उचलली जाते है त्यातलं तत्वज्ञान.
याने महाराजांना धाडस करुन विचारलंच महाराज एक विनंती आहे. मला काही दिवसापासून एक प्रश्न पडला आहे. मेहरबान होऊन आपण त्याचं उत्तर द्यावे म्हणजे माझा जीव भांड्यात पडेल. महाराज म्हणाले सांग काय प्रश्न आहे. टॉमस म्हणाला गडाची वाट एवढी निसरडी, अरुंद असताना हे एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे आणि कोठून ? महाराज म्हणाले त्यात काय एवढं हत्ती खालून वर म्हणजे पायथ्यापासून गडावर आणले! कळलं पण मुळ प्रश्न हाच की ते आणले कसे? महाराज म्हणाले चालवत आणले. त्यात काय एवढं अवघड आमचा जाणकार मावळा हत्ती पकडण्यात तरबेज होता त्याला दोन हत्तीची पिल्लं पकडून कर्नाटकातून आणायला लावली. ती पिल्लं इथं आणल्यावर त्या मावळ्यानं त्यांना खाऊ पिऊ घालून लळा लावला आणि मग एके दिवशी आम्ही ती हत्तीची पिल्ले वर आणली. टॉमस पुन्हा अधीरतेने म्हणाला महाराज प्रश्न शिल्लक आहे की पण कसे ?
त्यावर महाराज म्हणाले आता तुझी जिज्ञासाच आहे तर सांगतो आमचा तो सरावलेला मावळा डोक्यावर हिरव्या चाऱ्याची पेंढी करुन काही दिवस डोंगरावर चढण्याचा सराव करीत होता. तो पुढे आणि हत्तीची पिल्ले मागे असा काही दिवस पक्का सराव एवढा मजबूत करुन घेतला की ती पिल्लं दोरखंडावरही तोल सावरुन चालू शकतील एवढी तरबेज केली आणि मग जेव्हा रायगडाची बांधणी सुरु करायची त्यावेळी सुरुवातीलाच हत्ती वर आणले. पुन्हा टॉमसचं तेच पण कसे? महाराज म्हणाले अरे तुला उत्तर सांगितलं ना कळत नाही का? महाराज नाही कळलं. इंग्रजांना पटकन गोष्टी कळतात असे मी ऐकलं होतं पण तुला कळालं नाही हे कळालं मला आता पुन्हा सांगतो नुसतं ऐकू नको समजून घे बरं.
डोंगराच्या धारेवर चालण्याचा पिल्लांना सराव केला आणि मग एके दिवशी नेहमीप्रमाणेच आमचा मावळा डोक्यावर चाऱ्याची पेंढी म्हणजे कडब्याची मोळी घेऊन पुढे चालू लागला. हत्तीची पिल्ले चाऱ्याच्या आशेने मावळ्याच्या मागे सवयीप्रमाणे चालू लागली आणि रायगडावर येऊन पोहोचली. आता ती चालत कशी निर्धास्त पोहोचली असे म्हणशील तर आधीच सांगतो त्याचं लक्ष फक्त मावळ्याचे पाय आणि डोक्यावरची मोली एवढ्यावरच होते. आणि किती अवघड वाटेने किती उंचावर जात आहोत याच्याकडे त्यांनी पाहिले नाही. म्हणून से खाली न पडता वर आले. या किल्ल्यावर येताना जो वाट सोडून इकडे तिकडे बघण्याचा उद्योग करतो तो खाली पडतो आणि वरं किल्ल्यावर घेण्याऐवजी थेट वर जातो बरं टॉमस.
त्यावर पुन्हा टॉमसने विचारलं पण हे सगळे केव्हा कैलं, महाराज म्हणाले जेव्हा आम्ही १६५६ ला रायरी म्हणजे हा रायगड ताब्यात घेतला त्याच वेळी एका वर्षाच्या आत. पण महाराज तुमचा राज्याभिषेक तर आता ६ जून १६७४ ला आणि तुम्ही हत्तीची पिल्ले गडावर आणलीत ती १८ वर्षे अगोदर किती मोठी तुमची दूरदृष्टी आणि निश्वयात्मक बुद्धी की इथेच एक ना एक दिवस तुम्ही राज्याभिषेक करणार!
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W
