यशस्विता अर्थात यशाची व्याख्या

१ .यशस्विता अर्थात यशाची व्याख्या
   Everybody wants success nobody wants failure. 

 

जन्माला आलेल्या प्रत्येकालाच यश हवे असते. अपयश कोणालाच नको असते. तरीही ८०, ९० टक्के लोक यशस्वी होत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, यश हे कोणाही ऐऱ्यागैऱ्याला मिळत नाही. ते ज्यांना अंतर्मनापासून हवे असते ते त्यांनाच मिळते. यशाची भूक किंवा आग ही अंतर्मनातूनच हवी असते. म्हणूनच असे म्हणतात आत्म्याची ग्वाही त्रिभूवनात नाही. तुम्हाला जे हवे ते तुम्ही मिळविणे हे तुमचे यशच असते. विचारवंतांनी यशाची व्याख्या ४ भागांत केली आहे. कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक व शारीरिक, जन्मापासून मरेपर्यंत आपण कुटुंबात जे वेगवेगळे रोल निभावतो ते एक नंबरचे निभावणे यालाच कौटुंबिक यशस्विता असे म्हणतात. आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात टॉपर बनणे याला व्यावसायिक यशस्विता म्हणतात. तसेच नीती नियम सिद्धांताने कार्य करून मिळविलेल्या यशाला सामाजिक यशस्विता म्हणतात. तर जन्मभर उत्तम आरोग्य निर्माण करून ते शेवटपर्यंत सांभाळणे यालाच शारीरिक यशस्विता म्हणतात. म्हणूनच तुम्ही संकल्प करून या चारही क्षेत्रांत यश मिळविल्यास त्याला मेगा सक्सेस म्हणतात. ते तुम्ही मिळवा.

काय म्हणून जन्म घ्यावा, कुठे जन्म घ्यावा हे जरी आपल्या हातात नसले, तरी काय म्हणून आणि कसे जगावे हे तर आपल्याच हातात असते. तुम्ही किती वर्षे जगलात त्यापेक्षा कसे जगलात याला फार महत्त्व असते. १०० वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक वर्ष सिंह म्हणून जगा. मी गरीब म्हणून जन्माला आलो होतो. कारण ते माझ्या हातात नवहते. पण मला स्वतःची ओळ झाल्यानतर, मी शपथ घेतली की मी गरीब म्हणून मरणार नाही, कारण ते कर्म माझ्या हातात होते.

जीवनात यशस्वी होण्याचा साधा मंत्र आहे. तो म्हणजे स्वतःला ओळखा Who am I? मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झाला आहे आणि मरण्यापूर्वी मला काय मिळवायचे? म्हणजेच स्वतःची ओळख स्वत करा. आवडीचे क्षेत्र निवडा किंवा निवडलेल्या क्षेत्रात आवड निर्माण का निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत बना. तुम्ही यशस्वी झालेच महणू समजा. यश ही काही एका रात्रीत मिळणारी गोष्ट नाही. तर ती एक सततच क्रिया असते. यशासाठी असे म्हणतात For success you should be ambitious, you should be laborious, you should be honesty and you should be punctual. म्हणजेच सर्वोत्तम यशासाठी तुम्ही १ महत्त्वाकांक्षी बना. २) कष्टाळू बना ३) स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक राहा ४) वेळेचे महत्व समजा. खरे तर सर्वोत्तम यशस्वितेसाठी तुमच्यामध्ये चांगल गुण, चांगल्या सवयी आणि चांगली संगत असणे अत्यंत गरजेचे असते त्याबद्दल पुढे एका एका मंत्रामधून यशस्वितेसाठी लागणारे गुण, सवयी, विचा मी सांगणारच आहे. तुम्ही ते लक्ष देऊन परत परत वाचा आणि त्याच अंमलबजावणी करा. त्यामधून तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते असा माझा स्व अनुभव आहे.

मी ‘यशाचे १११ मंत्र’ ही पुस्तिका मोफत देत आहे. ती आपल्या व कुटुंबातील प्रत्येकाच्या उपयोगाची आहे. आपण ती आवर्जून वाचावी व स्नेहीजनांनाही आग्रहपूर्वक वाचायला द्या. या माध्यमातून सर्वांनी यशस्वी व आनंदी व्हावे यासाठीच माझा हा प्रपंच आहे. धन्यवाद.

 

    नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

 

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:                                    https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!