२. Analysis of external enviroment : बाहेरील परिस्थिती किंवा वातावरणाच विश्लेषण करा
आपण नियोजन करताना एकदा का आपली अंतर्गत परिस्थीती म्हणजे ताकद आणि कमजोरी यांचा विश्लेषण केले की मग पुढची पायरी म्हणजे बाहेरील वातावरण परिस्थीती ज्यात तुम्हाला काम करायचं आहे त्याचं विश्लेषण करा आणि हे विश्लेषण करता यावं म्हणून त्या संदर्भातील सगळी माहीती डेटा गोळा करा. माहिती गोळा २ करता विश्लेषण कसलं करता ! दूध गोळा केल्याशिवाय तापविणे होईल का? तापविल्याशिवाय साय येईल का? आणि सायशिवाय दही लागेल का! आणि दह शिवाय लोणी आणि लोण्याशिवाय तुप होईल का! तसे हे.
बाहेरील परिस्थीतीचं विश्लेषण करायचं म्हणजे काय तर भविष्यातील घडामोडींचा अंदाज बांधण्यासाठी भूतकाळ आणि वर्तमान काळातील बदल अभ्यासायचे जर तुमचा डेटाच चुकला तर विश्लेषण बरोबर होईल का। आणि विश्लेषणच चुकले तर योग्य नियोजन होईल का ? आणि नियोजन जर कमजोर पडले तर ध्येय प्राप्त होईल का? आणि अशा प्रकारे आपण अभ्यासपूर्वक विश्लेषण केल्याचा आपल्याला एकाईला फायदा होतो आणि तो म्हणजे आपल्याला संधी कोठे आहे, किती आहे यांचा शोध लागतो अंदाज येतो. आणि त्याचवेळी दुसरा फायदा जो आपले नुकसान टाळतो तो म्हणजे आपल्याला कोठून आणि किती प्रमाणात धोका मिती निर्माण होऊ शकतात याचाही अंदाज बघेता येतो किंवा त्या धोक्यांच्या बाबतीत सावध होऊन उपाय योजना करता येतात. धोके लक्षात घेऊन जर आपण नियोजन केले तर आपल्याला ध्येय गाठण्यात काही अडचण येत नाही.
Weaknesses are not weakness but they are the areas of improvements – SWOT Analysis
प्रश्न जितका गंभीर तितके उत्तर शोधा खंबीर
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W
