6.follow up : आता निर्णयाचा मागोवा घ्या.
एकदा निर्णय घेतला म्हणजे तो कार्यभाग संपला असे नव्हे निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते. कुठपर्यंत होते यावर सातत्याने लक्ष ठेवा. जर काही उणीव भासली तर ताबडतोब कराव्या लागणाऱ्या कारवाईच्या तयारीत रहा जर काही महाराजांनी तानाजी मालुसरेला कोंढाणा जिंकायला पाठविल्यानंतर स्वतः राजगडाजी म्य योपन राहिले नाहीत. तर स्वतः महाराज, जिजाऊ आणि शंभू राजे डोळ्यात तेल घालून कामाच्या अंमलबजावणीच्या इशाऱ्याची वाट पहात होते. आणि आणीबाणी निर्माण झाल्यास तानाजीला कुमक करण्यासाठी सज्ज उभे राहिले होते. अर्थात आपणाला माहितच आहे की तानाजीला अंमलबजावणी करताना, खर्ची पडाव लागलं म्हणजे निर्णयाची अंमलबजावणी करताना आकस्मीक अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा शेलार मामा आणि सूर्याजीने कोंढाणा जिंकलाच. महाराजाचं ध्येय प्राप्त केलं आणि दिलेल्या आदेशाची प्राणापलीकडे जाऊन अंमलबजावणी केली यालाच म्हणतात निर्णयाचा मागोवा घेणं. म्हणेजच जो निर्णय घेतला त्यातील काही मागे तर राहिलं नाही ना याची दक्षता घेऊन पुढे जाणे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
