२०. जंगलाचा राजा सिंहच का ?
राजा हा सर्वगुण संपन्न असायला हवा. सिंह हा हत्ती इतका वजनदार नाही, कोल्ह्याइतका हुशार नाही, जिराफाइतका उंच नाही, हरणाइतका चपळ नाही; तरी ही सिंह हाच जंगलाचा राजा असतो. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याचा सकारात्मक दृष्टिकोन. सिंहाच्या डोक्यात नेहमी सकारात्मक विचार येत असतात. समोर हत्ती आहे की जिराफ आहे, हरिण आहे की गवा आहे, रानडुक्कर आहे की वनगवा आहे. याचा तो विचार करीत नाही.
त्यांच्या शक्तीचाही तो विचार करीत नाही. भक्ष्याची कमजोरी हेरून तो सावज टिपण्यात यशस्वी होतो. समोरच्या भक्ष्याचा आपल्याला फडशा पाडायचा आहे. हा सकारात्मक विचार त्याच्या डोक्यात रुंजी घालत असतो. त्याची डरकाळी अर्थात सिंहगर्जना हेच त्याचे शब्द असतात तर त्याची झेप हीच त्याची action अर्थात कृती असते. म्हणूनच तो जंगलाचा राजा असतो.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
