जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

४. Innovative : नावीन्यता

कार्यकर्त्यांना नेहमी नवीन विचार त्याच गोष्टी नवीन पद्धतीने करण्याची कल्पना, नवीन गोष्टी नवीन युक्तीने करण्याची नेहमी उत्सुकता राहिलेली असते. ती उत्सुकता जिज्ञासा ही तुमची भांडवली गुंतवणूक समजा. नवीन गोष्टी आव्हानात्मक असतात आणि कार्यकर्ता नेहमी आव्हानात्मक गोष्टींनाच उचलून धरतो. म्हणून तुम्ही आव्हानांना खांद्यावर घ्या. कार्यकर्ते तुम्हाला खांद्यावर घेतील. तुम्ही एक पाउल पुढे जा कार्यकर्ते तुमच्याकडे पाहून दहा पावले पुढे जातील. तुम्ही एक दगड मारा कार्यकर्ते सगळी इमारत जमीनदोस्त करतील. खरं तर दगड मारणं हे कोणत्याही नेत्याचं शहाण्या नेत्याचं काम नसतं पण कार्यकर्त्याना जर तेच आवडत असेल तर नुसतं दगड फेकल्यासारखं नाटक करा. बघा तुमचे अनुयायी काय कृती करतात ते. सदैव नाविन्यतेची कास पकडणाऱ्या नेत्याचा अनुयायांवर तेवढा प्रभाव असतो म्हणून तसे होते

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!