४. Innovative : नावीन्यता
महाराजांचा नाविन्यता हा गुण आणखी वेगळ्या प्रकाराने सांगितली जाईल. उदा महाराजांनी प्रत्येक वेळी नवीन कल्पना शक्कल लढवलेली दिसते. एका कल्पनेची कुठेही पुनरावृत्ती नाही. अफजल खानाला मारला तसा दुसऱ्या कोणालाही मारले नाही. शाहिस्तेखानाचा हात ज्या सफाईने कापला तसा दुसऱ्या कोणाचा कापलाच नाही. सुरतेवर छापा घालण्याची पद्धत कारंजासाठी वापरली नाही. पन्हाळ्यातून सुटका करुन घेताना वापरलेली युक्ती परत कोठे वापरली नाही. आग्र्यातून बाहेर पडताना बादशहाच्या हातावर ज्या दिवसा ढवळ्या तुरी दिल्या तशा दुसऱ्या कोणाला दिल्या नाहीत. एकाच बहादूरखानाला तीन वेळा फसविला. परंतु प्रत्येक वेळी नवीन युक्ती लढवून आणि गेली कित्येक शतके हिंदू राजाचा या देशात राज्याभिषेक झालेला नसताना महाराजांनी पगारी माणसं ठेवून बिदागी देऊन करुन घेतला. या सर्व गोष्टीचा महाराजांच्या सहकाऱ्यावर एवढा प्रभाव पडलेला दिसतो की ते आयुष्यभर देवापेक्षा महाराजांना मोठे मानत होते. अहो त्यांच काय घेऊन बसलात आज ३८० वर्षानंतर मी लिहितोय तुम्ही वाचताय आणि मला तर वाटते महाराजांच्या या नाविण्यतेचे गारुड पुढची पाच हजार वर्ष आपल्या बुद्धीमतेला साद घालत राहील. एवढा मोठा प्रभाव तोही आपल्या मृत्यूनंतर तिनशे-चारशे वर्षानंतर राहणं हे नाविन्यतेच्या व्यवस्थापकीय कौशल्याचं यशस्वी नेतृत्वाचं किती मोठं ज्वलंत उदाहरण आहे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
