5.Self confidence: आत्मविश्वास
जोपर्यंत तुम्ही खंबीर मनाचे नसता तोपर्यंत तुम्ही बहुमताच्या बाजूने असता आणि जेव्हा तुम्ही खंबीर असता तेव्हा बहुमत तुमच्या बाजूने असते. दुसऱ्या शब्दात जेव्हा तुम्ही बहुमाताच्या बाजूने जाता तेव्हा तुम्ही कार्यकर्ता आहात असे समजा आणि जेव्हा बहुमत तुमच्या बाजूला असेल तेव्हा तुम्ही नेताच आहात. त्यामुळे बहुमताच्या बाजूने जायचे की बहुमत तुमच्या बाजूला खेचून आणायचे हे तुम्ही ठरवा. अर्थात आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी नेता होऊ शकता. मोठमोठ्या संकटांच्या नद्या पार केल्या जातात त्या आत्मविश्वासरुपी जहाजाच्या बळावर. मोठमोठ्या वादळांना सामोरे जाता येते तो सह्याद्री पर्वताप्रमाणे खंबीर आत्मविश्वास असेल तर. म्हणून सह्याद्री जिंका जग आपोआप तुमच्या पायावर लोळण घेताना तुम्ही याची देही याची डोळा पाहताल.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
