२६. महान बना
महान बनण्यासाठी आजपासून दुसऱ्यांना दोष देणे बंद करा. जे काही चांगले होणार ते फक्त तुमच्यामुळेच आणि जर काही वाईट झाले तर तेही तुमच्यामुळेच. तुम्ही महान बनलात तर त्याचे श्रेय तुमच्या आदर्शाना आणि सहकाऱ्यांना द्या. आणि जर तुम्ही महान बनला नाहीत, तर त्याचा दोष, त्याची जिम्मेदारी स्वतःकडे घ्या. म्हणजे पुढील प्रयत्नात तुम्ही महान बनाल. महान बनणे ही एक प्रक्रिया असते. ती एका दिवसात, महिन्यात, एका वर्षात होणार नाही. कमीत कमी तीन वर्षे तुम्ही सर्वस्व पणाला लावून काम करा. तुमच्यातील झालेला चांगला बदल तुम्ही निश्चित अनुभवाल. त्यानंतर तुम्ही महान बनाल. लोखंडाला कोणीच संपवू शकत नाही. त्याने स्वतःवर चढून घेतलेला गंजच लोखंडाची माती करतो. तसे तुम्हाला महान बनण्यापासून दुसरे कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी तुमचे ध्येय, महत्त्वाकांक्षा, चांगले कर्म आणि सातत्य ठेवून काम करा. म्हणजे तुम्ही महान बनण्याच्या दिशेने वाटचाल कराल आणि एक दिवस तुम्ही निश्चित महान बनाल. महान लोक स्वतःला काही मिळविण्यासाठी नव्हे तर दुसऱ्याला देण्यासाठी काम करतात म्हणून ते महान म्हणविले जातात. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपण रडत असतो आणि जग हसत असते. पण महान व्यक्ती जेव्हा मरतात तेव्हा लोक रडत असतात आणि महान व्यक्ती हसत असतात. तुमचा जन्म महान बनण्यासाठी झालेला आहे ते रोज लक्षात ठेवून कार्य करा आणि महान बना.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
