९. माणसं हाताळण्याचं कौशल्य
चला तर आजपासून माणसं मिळवायला सुरुवात करुया. मिळवलेली माणसं जपूया, जोपासुया आणि आयुष्यात यशस्वी होऊया. माणसं हीच जगातील मोठी संपत्ती आहे. ज्यांच्याकडे जेवढी जास्त माणसं तेवढा तो माणूस श्रीमंत होय. श्रीमंत म्हणजे यशस्वी माणूस पैशावाला नव्हे. नोटा जमवतो तो पैशावाला आणि माणसं जमवतो तो श्रीमंत. शून्यातील माणसं गोळा करा. त्यांना शिकवा. समृद्ध करा पहा आपोआपच तुम्ही सुद्धा मोठे होता. अर्थात आता तुम्ही ठरवा माणसं कमावून यशस्वी व्हायचं कि पैसा कमावून पैसावाला व्हायचं, आणि त्याच वेळी हेही कायम लक्षात ठेवा पैशावाल्याचं नेतृत्व त्यांच्या मरणाच्या क्षणीच संपते तर शिवाजी महाराजासारख्या श्रीमंत योग्याच नेतृत्व त्याच्या मृत्युनंतरही हजारो वर्षे लोक स्विकारतात. एका यशस्वी नेत्याचं हे खूप बोलकं उदाहरण आपल्या देशात झालंय आपण समजून घेऊया.
आपल्यासाठी जीव देणारी माणसं तयार करा पण जीव घेणारी माणसं तयार करण्याचं पाप करु नका. समाजासाठी मरणारी माणसं तयार करा. स्वार्थापोटी मारणारी लोक अजिबात तयार करु नका. अशी माणसं जन्माला येणारच नाही असं नाही ती जन्माला येतील आणि त्यांना तशी विधायक दिशा देणे ही एक चांगला नेता होऊ इच्छीणाऱ्या तुमच्यासारख्याची जबाबदारी आहे आणि म्हणूनच हे माणसं हाताळण्याचं कौशल्य आपण आत्मसात करुया
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
