३५ .मागील दरवाजा बंद करा
कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे फक्त ३०० मावळ्यांसह घोरपडीला दोर बांधून किल्ल्यावर चढले. त्वेषाने लढत असताना दुर्देवाने तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. त्यावेळी त्वेषाने लढणारे मावळे घाबरून पळून जाऊ लागले. तेव्हा ८० वर्षांच्या शेलार मामांनी मावळ्यांना सांगितले, आपण जो दोर चढून वर आलो आहे, तो दोर मी कापून टाकला आहे. आता परत जायाचे तर १०० टक्के मृत्यू व व लढले तर विजय आपलाच. असे म्हटल्याने परत जाण्याचा मार्ग बंद झाला आणि मावळे सकारात्मक विचार करून पुन्हा त्वेषाने लढले व जिंकले. ते शूर होते म्हणून नव्हे तर परतीचे दोर कापल्याने जिंकले. मी स्टेट बँकेच्या नोकरीचा राजीनामा देऊन परतीचा दरवाजा बंद केल्यामुळेच एक यशस्वी उद्योजक झालो. तुम्हीही मागील परतीचा दरवाजा बंद करा व जीवनात यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
