जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

१०. Administrative skill : प्रशासकीय कौशल्य

एका यशस्वी नेता होऊ ईच्छीणाऱ्या व्यक्तीला चांगले प्रशासकही व्हावे लागते. आता तुम्ही म्हणाल प्रशासक व्हायचं म्हणजे आम्ही I.A.S. I.P.S. IFS ची परीक्षा द्यायची का? तर अजिबात नाही. तुम्ही प्रशासकीय कौशल्य एवढ्या उच्च पातळीपर्यंत अवगत करायचं की L.A.S., I.P.S. IFS केलेली विद्वान मंडळी फायली घेऊन तुमच्या मागे पळाली पाहिजेत. हुशार नेता आपल्यापेक्षा हुशार लोकांना आपल्या हाताखाली कामाला ठेवत असतो. पहा तुम्ही जगातील किती श्रीमंत लोकांनी M.B.A.ची पदवी घेतली आहे आणि M.B.A झालेले किती लोक जगातील प्रथम क्रमांकाच्या १०० श्रीमंताच्या यादीत दिसतात आजपर्यंत IPS, IAS, IFS आणि M.B.A झालेला एकही विद्वान जगातील सगळ्यात श्रीमंत झालेला नाही.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!