जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

११. Discipline शिस्त

कडक शिस्तीबाबत महाराजांचे पत्र उपलब्ध आहे १८ जाने १६७५ दर्यासारंगाने सुभेदाराची तक्रार महाराजांकडे केली. नुकतेच रायगडावर परतलेले महाराज या तक्रारीमुळे विलक्षण संतापले. त्यांनी कडक शब्दात लिहिलेले ताकीद पत्र जिवाजी विनायकाकडे त्वरीत रवाना केले. पत्रात महाराजांनी सुभेदाराला खडसावले की, “… पद्मदुर्ग बसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी, पाणी, फाटी आदीकरुन सामान पावावे, या कामास आरमार बेगीने पाठवावे ते नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाववून आरमार खोळंबून पाडाल ! एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करु म्हणाल, त्यावरी साहेब रिझतील की काय ? हे गोष्ट घडायची तहा होय, न कळे की, हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील. त्या करता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐशा चाकरास ठीकठाक केलेच पाहिजेत ! ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो?… या उपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर, गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल, ताकीद असे.”

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!