‘ब्रँण्ड’ हा एका रात्रीत होत नाही..
अमॅझॉन कंपनीचे सीईओ, संस्थापक जेफ बेझॉस असे म्हणतात की, “तुम्ही खोलीत नसताना इतर लोक तुमच्याबद्दल काय बोलतात – तो तुमचा बॅण्ड.” या एका वाक्यात कितीतरी मोठा अर्थ सामावलेला आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. अजुन थोडं सोपं करून सांगायचं झाल्यास, “आपल्या पाठीमागे लोक आपल्याबद्दल (म्हणजे आपल्या कंपनीबद्दल किंवा प्रॉडक्टबद्दल) जे काही बोलतात, ते म्हणजे आपला बॅण्ड. आपण आपल्या ग्राहकांच्या मनात आपल्याबद्दल नेमकी काय प्रतिमा निर्माण केली आहे किंवा करत आहोत? याचा प्रत्येक व्यावसायिक – उद्योजकानं नेहमी विचार केला पाहिजे. तपासून पाहिले पाहिजे. आपल्या कंपनीची, उत्पादनांची किंवा सेवेची गुणवत्ता सर्वोत्तम तर असायलाच हवी पण त्याबरोबरच आदर आणि विश्वास देखील जपला गेला पाहिजे. आपलं नाणं इतकं खणखणीत असलं पाहिजे की, कमालीच्या गर्दीतही (इथं स्पर्धा असा अर्थ देखील तुम्ही घेवू शकता.) त्याचा आवाज सगळीकडे घुमला पाहिजे. दर्जा आणि नाविन्य इतकं आश्चर्यकारक हवं की ग्राहकांच्या मनावरती आपल्या बॅण्डचा ठसा उमटला पाहिजे. आणि हो… या गोष्टी काही झटपट होत नाहीत. ‘ग्रॅण्ड’ हा एका रात्रीत होत नाही. ग्राहककेंद्रीत सेवा व उत्कृष्ठ क्वालिटी सिध्द करावीच लागते. हल्ली हे शब्द इतके गुळगुळीत झालेत की कधी-कधी त्यातली खोली हरवत चालली आहे असेही वाटते. मात्र मोठ-मोठे बॅण्डस् याची प्रचंड काळजी घेतात. तसेच आपला वेगळेपणा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. ग्राहकांशी ग्राहकांच्या भाषेतच बोलावं लागतं. जाहिरातीच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. जाहिरातींद्वारे सांगितली जाणारी माहिती वाचकांच्या ग्राहकांच्या डोक्यावरून जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सहज-सोप्या पध्दतीने आणि नेमकेपणानं आपला मेसेज, आपला वेगळेपणा व आपली खासीयत ग्राहकांना सांगणं गरजेचं असतं. सोपं करून सांगणं सोपं नसतं. त्यासाठी सल्लागार व तज्ज्ञांची वेळोवेळी मदत घेत चला. फक्त आकर्षक लोगो म्हणजे बॅण्ड नाही. जसं आकर्षक कपडे घातलेली व्यक्ती गुणी असेलच असं नाही. ‘बॅण्ड मेकिंग’साठी इतरही खूप गोष्टी महत्वाच्या असतात. ज्याबद्दल पुढे मी आपल्याशी बोलणार आहे. दिलेला शब्द आणि दिलेलं वचन पाळणारी माणसं मोठी होतात. अगदी तसंच कबूल केलेले “प्रॉमिस’ आणि दिलेला विश्वास सार्थ करणारी उत्पादने संस्था या बॅण्ड होतात. मग त्यांच्या गुणांची चर्चा चार मितीच्या खोलीतच काय तर आख्ख्या जगात होते. तीही अभिमानानं. आपलेपणानं…! फॅक्टरीमध्ये तर वस्तू तयार होतात, पण खरा बॅण्ड तयार हातो तो ग्राहकांच्या मनामध्ये !
जेफ बेझॉस
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.व अमॅझॉन कंपनीचे सीईओ, संस्थापक )
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
