“निकल पडो… रास्ते मिलते जायेंगे…”

“निकल पडो… रास्ते मिलते जायेंगे…”

हे वाक्य आहे ५८ वर्षीय अरोकियास्वामी वेलुमनी यांचं एका गरीब शेतकऱ्याच्या मुलानं ३६०० करोडची कंपनी उभारली. कंपनीचं नाव आहे ‘थायरो केअर’ हा ब्रँड म्हणजे उद्योजकांना नवी ऊर्जा आणि दिशा देणारं जितं-जागतं उदाहरण आहे. रात्रीच्या एक वाजता मी हे आर्टिकल लिहिताना वेलुमनींचं ‘निकल पडो… रास्ते मिलते जायेंगे’ हे वाक्य सारखं सारखं माझ्या कानामध्ये घुमत आहे. कानातून मनात आणि मनातून कागदावर उतरवण्यासाठी माझी लेखणी आसुसली आहे. जगाला भुवया उंच करायला लावणाऱ्या ‘थायरो केअर’ ग्रॅण्डचा प्रवास थक्क करणारा आहे. खूप काही शिकवणारा आहे. नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या ‘संवाद-२०१७’ उद्योजक मेळाव्यात आदरणीय वेलुमनीजी बोलत होते. “जितने के लिये काम करोगे, तो शायद कभी हार सकते हो… लेकिन जिताने के लिये काम करोगे, तो जिंदगी मेकभी नहीं हारोगे..” त्यांचा एकेक शब्द प्रेरणेचा समुद्र होता. अशा ऐतिहासिक कार्यक्रमात मला सहभागी होता आलं हे मी माझं भाग्य समजतो. ‘थायरो केअर’ च्या देशभरात १२०० फ्रेंचाईसी आहेत, जवळ-जवळ १००० हून अधिक लोक येथे कार्यरत आहे. तामिलनाडू – कोईम्बतूर मधल्या पेनुरी या छोट्याशा गावातील वेलुमनीजी मुंबईत येवून शुन्यातून सुरुवात करून ‘थायरो केअर’ सारखा विश्वविख्यात ब्रँड निर्माण करतात. त्यांची वाट, त्यांचा संदेश, त्यांची विचारधारा सर्व व्यावसायिक उद्योजकांना प्रेरणादायी आहे. ते म्हणतात की, “जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देण्यासाठी काम करता, तेव्हा तुम्हाला भरभरून मिळतं. अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. फोकस करा. धोका पत्करा. स्टमिना वाढवा. टेक्नॉलॉजीचा वापर करा. टी-टी-टी (Truth – Trust – Transparency) जपा हिमत करा, पुढे निघा.. रस्ते तुम्हाला मिळत जातील.” आणखी एक महत्वपूर्ण ग्रॅण्ड, ‘बीव्हीजी’ (भारत विकास ग्रुप) चे सर्वेसर्वा श्री. हनमंतराव गायकवाड यावेळी म्हणाले, “जगात खूप संधी आहेत, फक्त जग उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे.” आज बीव्हीजी ग्रुप राष्ट्रपती भवन, राज्यसभा, लोकसभा, रेल्वे, इ. महत्वपूर्ण ठिकाणी सेवा पुरवण्याचे काम करत आहे. गायकवाड म्हणतात की, “जे कराल ते सर्वोत्तम करा. सच्चाई आणि प्रामाणिकपणे करा. यशाचा हाच मार्ग आहे.” ‘मुंबईचा डबेवाला’ आपल्याला माहित असेलच. आज हा मोठा बॅण्ड झाला आहे. मॅनेजमेंटमध्ये सगळ्या जगालाआश्चर्यचकित करणारे श्री. सुभाषजी तळेकर म्हणतात, “तुम्ही फक्त्त चांगलं काम करत राहा, जग दखल घेतं.” सिक्स सिग्मा सन्मान प्राप्त करत ‘मुंबईचा डबेवाला’ ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये थाटात सामील झालाय. एवढंच नव्हे तर ‘प्रिन्स चार्ल्स’ देखील या डब्बेवाल्यांना भेटायला खास भारतात, चर्चगेट स्टेशनवर आला होता. सांगायचं तात्पर्य एवढंच की, ग्रॅण्ड निर्माण करताना आपला प्रवास आणि प्रवाह हा एखाद्या नदीसारखा असायला हवा. वाटेत समस्या, अडचणी, दगड-धोंडे काहीही आले तरी नदी ही न थांबता आपला मार्ग काढतेच. तसेच व्यावसायिक-उद्योजकांनी कधीही कुठल्याही प्रसंगात न थांबता, परिस्थितीचा सामना करत हिंमतीनं आणि प्रामाणिकपणे पुढे जात राहिलं तर जग तुमच्या पायाशी लोळण घेईल, यात शंका नाही.

अरोकियास्वामी वेलुमनी

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!