जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

१२. Patience : संयम

आतापर्यंत आपण यशस्वी नेल्याचे गुण काय असतात ते पाहीले. परंतु यशस्वी नेत्ता व्हायचं म्हणजे कोणाचे तरी अनुकरण करुन चालत नाही. प्रत्येक नेत्याची आपली पद्धत आपली स्वतःची अशी style असते. तुमची स्टाईल सुद्धा जरा हटकेच असली पाहीजे, लक्षात ठेवा लोकांना नवे-नेते आवडतात ज्यांची style नवीन असते. ओल्ड वाईन इन न्यु बोटल या क्षेत्रात लागू पडत नाही. नेतृत्वाचे प्रकार हे संस्था ते संस्था, कंपनी ते कंपनी, राज्य ते राज्य आणि देश ते देश वेगवेगळे असतात. नेतृत्वाची एकच स्टाईल सर्वकाळ राहत नाही आणि ती सगळीकडे स्विकारली सुद्धा जात नाही.

युरोपात नेता व्हायचं तर उद्योगपती असावं लागतं. जपान कोरीया मध्ये नेता व्हायचं तर व्यवसायिक पदवी घ्यावी लागते. आशियात विशेषतः अरब राष्ट्रात नेता व्हायचं असेल तर राजघराण्यात जन्माला यावं लागतं. काही देशात तर एखाद्या टोळक्याचा म्होरक्या असावं लागतं. काही देशात नेता होण्यासाठी लष्कराचं सेनापती व्हावं लागतं आणि आपला एकमेव देश आहे जेथे यातलं काही व्हावं लागत नाही. वर नमूद केलेली एकही गोष्ट तुमच्याकडे नसली तरी तुम्ही भारतात अगदी पत नसली

तरी पंतप्रधानही होऊ शकता तेथे मुख्यमंत्री होणं काय तेवढं अवघड असं आहे. तर आपल्या देशात वेगळी गुणवत्ता किंवा मापदंड निर्माण झाले आहेत. ते

पाळायला शिका. तुम्हाला नेता व्हायची हौस असेल तर ज्या प्रदेशात जे मापदंड किंवा मानदंड आहेत ते पाळायला शिका. तुम्ही आपोआप नेता होताल. तुम्हाला दक्षिणेच्या राज्यात नेता व्हायचं असेल तर थेट राजकारणाच्या आखाड्यात उतरुच नका. अगोदर चित्रपट क्षेत्रात उतरा. नाव, पैसा, प्रसिद्धी कमवा आणि थेट निवडणूक लढवून थेट मुख्यमंत्री होण्याची संधी घ्या. उदा. जय ललिता एक नायिका ते मुख्यमंत्री त्याच्याच विरोधात असणारे करुनानिधी तेही असेच तीच गोष्ट एन.टी. रामाराम याची तर उत्तरेकडे तुम्हाला नेता व्हायचं असेल तर एखाद्या घराण्याला चिकटून रहा. अगदी गोचिडींसारखे तुम्हाला एक ना एक दिवस मुख्यमंत्री ८० व्या वर्षी का होईना होता येईल आणि ते नसेल जमत तर स्वतःचा वेगळा पक्ष काढून सौदेबाज व्हा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!