नेतृत्वाच्या जगमान्य पद्धती

६. Paternalisitic style

नेतृत्व करण्याच्या या पद्धतीत एक कौटुंबिक वातावरण निर्मीती केलेली असते आणि त्या सौहार्दपूर्ण वातावरणात निर्णय घेतले जातात या पद्धतीत नेत्याला कुटुंबातील जेष्ठ आदरणीय व्यक्तीप्रमाणे मानसन्मान दिला जातो. नेतृत्व करण्याची ही पद्धत जपानमध्ये वापरली जाते तिथे कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्य आणि मालकाला कुटुंबप्रमुखाप्रमाणे समजले जाते. नेतृत्वाच्या ह्या पद्धतीत नेता आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करतो. परंतु निर्णय मात्र स्वतःच्या सारासार बुद्धीला स्मरुन घेतो आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी नेता स्वतः घेतो. यश आणि अपयश आले तरी तो आपले अंग झटकण्याची भूमिका ठेवत नाही. जिथे कमी कर्मचारी असतात अशा कंपन्यामध्ये सर्वसाधारणपणे अशी नेतृत्वाची पद्धत वापरली जाते. या पद्धतीत मोडणारे नेतृत्व आपले कर्मचारी, सहकारी यांना सल्ला देतो. मार्गदर्शन करतो त्यांचे विशिष्ट प्रसंगी सांत्वन करतो आणि अडचणीच्या प्रसंगी मदत देखील करतो.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!