४०.कधीही बंद न होणारे ७ व्यवसाय
तुम्ही बेरोजगार असाल, शाळा कॉलेजमध्ये शिकत असाल किंवा नोकरी करत असाल तरी साईड बिजनेस म्हणून व्यवसाय सुरू करा. हे ७ व्यवसाय कधीच बंद पडणार नाहीत.
१. अन्न : म्हणजेच फूड इंडस्ट्री. भाजीपाला, दूध, धान्य, छोट्या चहा, नाष्ट्याच्या टपरीपासून हॉटेलपर्यंतचा व्यवसाय किंवा बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनवर कमिशन बेसिसवरही व्यवसाय करू शकता.
२. वस्त्र : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कपडे लागतात. हातरुमाला पासून सर्व रेडीमेडस किंवा कापड विकू शकता.
३. निवारा : रियल इस्टेट बिजनेस. प्लॉट, घर, दुकान, जमीन खरेदी-विक्री व्यवसायात तुम्ही एजंट म्हणून काम करू शकता.
४. शिक्षण : शिक्षणातील स्किल डेव्हलप करून तुम्ही ऑनलाईन, ऑफलाइन क्लासेस किंवा ट्रेनिंग देऊ शकता.
५. आरोग्य : योगा, मेडिटेशन पासून फूड सप्लीमेंट, मेडिकल असे व्यवसाय करू शकता.
६. विमा : विमा ही काळाची गरज झाली आहे. जनरल इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्सची एजन्सी घेऊन खूप मोठे करिअर करू शकता.
७. ट्रॅव्हल इंडस्ट्री : ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी तुम्ही एखादी सेकंड हॅन्ड गाडी घेऊन प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट चालू करू शकता. यामध्ये कार, स्कूल व्हॅन, बस, ट्रक टेम्पो भाड्याने चालवू शकता.
जोपर्यंत माणूस जन्माला येत राहील, तोपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, विमा आणि ट्रान्सपोर्ट हे व्यवसाय चालूच राहतील ते कधीच बंद होणार नाहीत. म्हणून या बिगर भांडवली किंवा छोट्या भांडवलातून तुम्ही व्यवसाय सुरू करून पुढे मोठे उद्योजक बना.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
