नेतृत्वाच्या जगमान्य पद्धती

७. Sociocratic style

नेतृत्व करण्याची ही पद्धत म्हणे एखादा सोशल क्लब चालविण्यासारखी आहे. या पद्धतीतील नेत्याची मानसिकता म्हणजे उत्पादन क्षमतेपेक्षा किंवा उत्पादकतेपेक्षा मैकी टिकवण्यावर, सहकाऱ्यांना खूष ठेवण्यावर भर दिला जातो. संस्थेचे नुकसान झाले तरी या नेतृत्वाला पर्वा नसते. माणसं टिकवण्यावर मोठा भर असतो. या नेत्याला असं वाटतं की आपण सहकारी कर्मचारी यांच्याबरोबर मधुर संबंध राखणं ही सामाजिक बांधिलकीची भूमिका आहे आणि त्यामुळेच ते लोकांनी चुका केल्या शिस्त मोडली तरी त्या तेवढ्या मनावर न घेता, त्या नजरेआड करुन या लोकांना सोबत घेऊन काम करण्यावर भर

असतो. थोडक्यात हा नेता खुषमस्कऱ्या आणि भाट लोकांना हरभऱ्याच्या झाडावर चढविणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणं पसंद करतो इथे पुढे जाणं हा भाग कमी आणि सोबत राहणं हा भाग जास्त असतो. त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व एकतर पुढे जात नाही किंवा आहे तेथून खाली येत. लक्षात ठेवा बाजारबुणग्यांची फौज बाळगून युद्धे जिंकता येत नाहीत. सहकाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कंपनीच्या संस्थेच्या हिताला दुय्यम प्राधान्य देणारा नेता त्याच्या संस्थेसह नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सोसल तेवढंच करावं त्याला म्हणतात सोशल नेतृत्व प्रकार, उदार होऊन प्रकरण उधारीपर्यंत जाणार नाही याची काळजी घ्या.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!