४७.ऐकायला शिका:Be a listener
ऐकल्याने काय होते. यासंबंधी एक बोधकथा सांगितली जाते. अल्बर्ट आईन्स्टाईन ने जगाला सापेक्षतेचा सिद्धात सांगितल्याने, त्याला मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही मिळाल. त्यानंतर त्याना व्याख्यान देण्यासाठी अनेक ठिकाणावरून निमंत्रण येऊ लागली. त्यामुळे अल्बर्ट आईन्स्टाईन आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही कार ने व्याख्यान द्यायला जाऊ लागले. ४० व्याख्याने
दिल्यानंतर, एका नवीन ठिकाणी जात असताना, आईन्स्टाईन ड्रायव्हरला म्हणाले, भी भौतिक शास्त्रातला शोध सांगून सांगून बोअर झालो. इतका अवघड विषय लोकांना समजावून सांगणे खूपच अवघड आहे. त्यावर ड्रायव्य म्हणाला, सर मला वाटते तुम्ही जरा जास्तच अॅक्टिंग करत आहात. खर तर तुम्ही जे सांगता ना! ते मी ४० दिवस मन लावून ऐकत आहे. त्यामुळे ते इतके सोपे आहे, की ते मी पण सांगू शकतो. आईन्स्टाईन म्हणाले ठीक आहे. पुढील गावात मला कोणी ओळखत नाही. आपण अदलाबदल करू त्यानंतर आईन्स्टाईन ड्रायव्हर झाले, आणि ड्रायव्हरने आईन्स्टाईनचे कपडे घातले. सभास्थळी गेल्यावर ड्रायव्हर महाशयाला आईन्स्टाईन समजून मुख्य अतिथी बनवले. ड्रायव्हरनेही ४० मिनिटाचे भाषण, न अडखळता, धन धन केले. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. आभार मानण्या अगोदर, संयोजकांनी ड्रायव्हर बनलेल्या आईन्स्टाईनला विनंती केली की, इथे काही बटू म्हणजे शिकाऊ शास्त्रज्ञ आहेत. ते तुम्हाला काही प्रश्न विचारु इच्छित आहेत. हे ऐकून ड्रायव्हर महाशयाना घाम फुटला. मन लावून ऐकलेले पाठांतर झालेले सांगितले. पण आता प्रश्नांची उत्तरे कशी देणार? शेवटी तो ड्रायव्हरही आईन्स्टाईनचाच होता त्यामुळे त्याने सांगितले मला वेळ नाही. त्यामुळे एकेक प्रश्न विचारू नका. सर्वांचे प्रश्न लिहून माझ्याकडे कागद द्या. जेव्हा कागद हातात आल्यावर या महाशयांनी तो उलटा धरला. त्याला काही वाचता येत नव्हते. पण तो ड्रायव्हरही ऐऱ्यागैऱ्याचा नव्हता. त्यांनी सांगितले मी इतका महान शास्त्रज्ञ असताना, तुम्ही इतके बाळबोध प्रश्न विचारले. मला तुमची किव करावीशी वाटते. या प्रश्नाची उत्तरे मीच काय! पण माझा ड्रायव्हर जो तुमच्यात बसला आहे, तोही देऊ शकतो. यस मिस्टर ड्रायव्हर प्लीज कम ऑन डायस अँड गिव्ह द अन्सर्स. त्यानंतर ओरिजिनल आईन्स्टाईनने सर्व
प्रश्नांची उत्तरे दिली.
लक्ष देऊन ऐकल्यानेच हे घडले. म्हणून तुम्ही कुठेही व्याख्यानाला, कीर्तनाला गेलात तर! सर्वात समोर बसण्याचा प्रयत्न करा. व्याख्यात्याच्या नजरेला नजर लावा. तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वोत्तम श्रोता बनून, चांगला वक्ताही बनू शकता! हा माझा स्व अनुभव आहे. म्हणून ऐकायला शिका व चांगले वक्तेही बना.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
