जगमान्य प्रेरणादायी घटक

जगमान्य प्रेरणादायी घटक

तर पैसा हा घटक खूप लोकांना प्रेरणा देणारा असा घटक आहे. लोकांना कामाच्या बदल्यात मोबदला मिळाला तर ती एक प्रेरणा अखंड प्रेरणा असते. जोपर्यंत तुम्ही पगार देणार तोपर्यंत लोक तुमच्यासाठी काम करणार. त्यात आणखी प्रेरणा द्यायची असेल तर योग्य मोबदला वेळेत द्यायला शिका आणि तो बऱ्यापैकी द्या. शिवाजी महाराजांना हा घटक चांगला माहित होता बरं. महाराज सर्व सैनिकांना न चुकता प्रत्येक प्रतिपदेला हमखास पगार देत असत. शिवाय जर मोहिमेवर जायची वेळ आली तर ४ महिन्यांचा आगाऊ पगार देत असत. आता कळलं ना लोक स्वराज्यात ईमानेइतबारे काम का करत ते आणि स्वराज्यात कधी कोणा स्वाराशिपायाला बंड करण्याची वेळ का नाही आली ते! आणि महाराजांच्या या वेळेत पगार देण्याच्या प्रेरणादायी गोष्ठीची नोंद एका युरोपियन इतिहासकाराने करुन ठेवली हे बरं झालं.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!