महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई क्षेत्रात आणखीन एक चमत्कार आपणाला पहावयास मिळतो, तो खुपच दुर्मिळ आहे परंतु लोकांसमोर येणे गरजेचे आहे. उदा. दाखल आपण असे म्हणु की समजा वेळ दिवसाची आहे आणि गडावर तोफा नसतील तर इशारत कशी देणार किंवा वेळ रात्रीची असेल आणि घटना खुप दुरवरची असेल तर संदेश वहन कसे होणार याचाही महाराजांनी चांगलाच पर्याय शोधला होता. सुरवातीच्या काळात महाराजांकडे तोफाच नव्हत्या पुढे हळुहळू जमवाजमव झाली आणि महाराजांनी किल्ल्या किल्ल्यावर तोफा पेरल्या. फिरता तोफखाना महाराजांकडे नसायचा आणि त्याचा मराठयांना उपयोग सुद्धा नव्हता. वेळ दिवसाची असेल आणि गडावर तोफा सुद्धा
नसतील तर अशा वेळी एका किल्यावरुन दुसऱ्या किल्ल्यावर संदेश पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली आणि अंमलात आणलेली युक्ती अजोड आहे. कोणत्या प्रकारची लाकडे जाळल्यावर पांढरा धुर निघतो आणि कोणत्या प्रकारची वनस्पती लाकडे जाळल्यावर काळा धुर निघतो याचा अभ्यास करुन महाराजांनी लाकडाचे वर्गीकरण करुन त्याचा साठा (स्टॉक) प्रत्येक किल्ल्यावर केलेला असे. जसा इशारा असेल त्याप्रमाणे ते वर्गीकृत केलेले लाकुड जाळले जाई. उदा. समजा बातमी चांगली आहे, कुठेतरी स्वराज्याच्या जमेची आहे अशा वेळी गडावर पांढरा धुर केला जाई. मग तो धुर पाहुन त्याच्या बाजुच्या किल्ल्यावर इशारत मिळाली कि त्या किल्ल्यावर पांढरा धुर करून पुढच्या आणि आजुबाजुच्या किल्लयांना इशारा दिला जाई.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!