७२.पैशाचे व्यवस्थापन Money management

७२.पैशाचे व्यवस्थापन
Money management

६) सिविल स्कोर सांभाळा व स्वस्तात कर्ज मिळवा –

तुम्हाला कोणत्याही बँकेकडून, फायनान्स कंपनीकडून कर्ज हवे असेल तर, तुमचा सर्वात महत्त्वाचा रिपोर्ट लागतो तो म्हणजे सिबिल स्कोर. CIBIL चा लाँगफॉर्म आहे Credit Information Bureau India Limited. ही कंपनी आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे तुम्ही किती विश्वासू आहात हे सांगते. तुम्ही या अगोदर घेतलेले कर्ज कसे फेडले, याचा स्कोर या रिपोर्ट मध्ये असतो. तो ३०० ते ९०० यामध्ये असतो. तुमचा स्कोर ७०० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात आणि लवकर कर्ज मिळते म्हणून बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. तुम्ही दिलेला चेक बाउन्स होऊ देऊ नका. क्रेडिट कार्ड द्वारे तर कधीचं कर्ज घेऊ नका. कारण ते खाजगी सावकाराप्रमाणे वसूल करतात. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज काढू नका. कर्ज घेतलेच तर योग्य प्रकारे कर्जाचे मनी मॅनेजमेंट करा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!