८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.
२) कच्चामाल + प्रक्रिया = उत्पादन Input + process = output
मिळालेली माहिती + प्रक्रिया = मिळणारे यश
योग्य माहिती + योग्य प्रक्रिया = योग्य यश
उत्तम माहिती उत्तम प्रक्रिया = उत्तम यश
शिवबा राजे जर तुम्हाला जाल तिथे आणि कराल त्या गोष्टीत यश मिळवायचे असेल तर दोन गोष्टींची नेहमी काळजी घ्या. एक म्हणजे तुम्हाला मिळणारी माहिती Input ही अचूक असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे तुमचे मिळालेल्या माहितीला अनुसरून करावे लागणारे नियोजन planning ही तेवढेच अचूक करावे लागेल. म्हणजे यश मिळण्यात काहीच कमतरता राहत नाही. तेव्हा यशाचा राजमार्ग आणि हुकमी एक्का हाच आहे की अचूक माहिती मिळवणे, अचूक नियोजन करणे म्हणजेच अचूक यश मिळविणे. जर मिळालेली माहिती अर्धवट, अपूर्ण, दिशाभूल करणारी असेल तर मग कितीही उत्तम नियोजन केले तरी ते फळाला येणार नाही. तेव्हा Input मिळणारी माहिती अचूकच असावी याची नेहमी काळजी घ्या. शिवाय एकदा का माहिती मिळाली की मग नियोजन करण्यापूर्वीच ती माहिती classify वर्गवारी करा. मग ती माहिती विश्लेषण करा. त्यातून हवी तेवढी माहिती घ्या नको असलेली काढून टाका आणि मग कृती करण्यासाठी आवश्यक गोष्टीची यादी करा आणि नियोजनाला बसा, खूप माहिती असण्यापेक्षा थोडी माहिती परंतु ती अगदी अचूक असलेली बरी. आपणाला मिळालेली माहिती आपण दुसऱ्या चॅनेलमधून खात्री करून घ्या. आणि मगच पुढचे पाऊल टाका. उत्तम माहिती घ्या आणि उत्तम नियोजन करा यश मिळालेच म्हणून समजा.
तेव्हा कायम असेच आपल्या मेंदूला सुद्धा माहिती पुरवताना प्रथम ती गोळा करा Collect करा. मग ती classify वर्गीकरण करा. मग त्या महितीचे बदलत्या परिस्थितीत विश्लेषण Analysis करा आणि मगच नियोजन करा. नियोजन करणं म्हणजे अर्ध यश अगोदरच मिळवणं आणि बाकीचं अर्ध कृती Action केली मिळालेच बघा.
तेव्हा नियोजन केल्याशिवाय कोणतेही काम हाती घ्यायचे नाही. आणि पूर्ण अचूक माहिती मिळाल्याशिवाय नियोजन करायचे नाही हा नियम लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी वेगवेगळी रणनिती वापरून हमखास यश मिळवायचे असेल तर अशा पद्धतीनेच काम करावे लागेल आणि ही प्रक्रिया सतत चालत राहिली पाहिजे आणि यात सतत सुधारणा करीत करीत गेले पाहिजे.
शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांची ही शिकवण अंमलात आणताना दिवसेंदिवस मोठ मोठे छापे टाकले, मोठमोठ्या लढाया जिंकल्या आणि स्वराज्य खूप वेगाने वाढवत नेले. याची काही उदाहरणे पाहू. जिथे महाराजांनी अचूक माहिती मिळवत उत्तम नियोजन केले आणि अशक्य कोटीतील यश मिळविले.
१. जावळीवर छापा – करोडो रुपयांची संपत्ती, सहा किल्ले, ६००० सैन्य आणि स्वराज्याचा तिप्पट विस्तार
२. अफजलखान वध आणि प्रचंड मोठी संपत्ती आणि कोल्हापूरपर्यंत स्वराज्य विस्तार
३. पन्हाळ्यातून उतरून, घोडखिंड आणि विशाळगड पायथा वेढा लढवून महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले.
४. आग्रा भेट आणि सर्व माणसांसहित आठ्यातून सहीसलामत सुटका.
तेव्हा मोठ्या यशासाठी मोठं नियोजन करा आणि त्यासाठी लागणारी अचूक माहिती तेवढ्याच कुशलतेने मिळवा. महाराजांनी सुरतेवर टाकलेला छापा तर अचूक माहिती आणि कुशल नियोजनाचाही एक अव्वल क्रमांकाचा असा धडा होय. त्याचेच घोडे घेऊन त्यांचे १०० कोटी होन घेऊन महाराज राजगडला सुखरूप आले. केवळ ४ दिवसांचा छापा तरी एवढी अगणित संपत्ती मिळाली की स्वराज्य मालामाल झाले. पुढे सात वर्षे मंदी आली तरी स्वराज्य कंगाल झाले नाही. कारण ही संपत्तीच तेवढी अफाट म्हणजे जवळजवळ १०० कोटी दोन लाख चाळीस हजार एवढी होय.
१००,००,००,००० २,४०,००० = २४०००००००००००००
********************************************************************************************************************************************************
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
