८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.
४. बुद्धिमान प्रश्न विचारा :
Ask intelligent question
राजे मी तुम्हाला ध्येयाकडे नेणारा हा सर्वात महत्त्वाचा असा हा चौथा मुद्दा सांगत आहे. ज्याला कोणाला मोठे व्हायचे त्याने हुशारीने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. प्रश्न तर कोणीही विचारते पण आपण विचारायचे ते नेहमी हुशारीचे प्रश्न असले पाहिजेत. प्रश्न असा विचारा की समोरचा प्रश्नात पडला पाहिजे आणि आपला प्रश्न तर जागेवर सुटला पाहिजे. केवळ आपला प्रश्न सोडवणे याला हुशारी म्हणता येत नाही. तर आपला प्रश्न सोडवताना शत्रूला दुसरा प्रश्न पडला पाहिजे याची व्यवस्था करा. बुद्धिमान माणसाने बुद्धिमान प्रश्नच विचारला पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारताना मी हे केलं पाहिजे का? का केलं पाहिजे. नाही केलं तर काय होईल? मग हे कसं करावं लागेल ? यातील सर्वात उत्तम मार्ग कोणता असेल असे प्रश्न स्वतःला देखील विचारले पाहिजेत. आपला आपल्याशी देखील आत्मसंवाद व्हायला पाहिजे.
योग्य प्रश्न विचारणे म्हणजे शत्रूला कोंडीत पकडणे होय. यासाठी तुमचे संवाद कौशल्य उत्तम पटीतलं असलं पाहिजे. हे जग म्हणजे शब्दांचाच खेळ आहे. म्हणून शब्द जपून तोलून मोलून वापरा. आणि असे शब्द वापरा की समोरचा निःशब्द झालाच पाहिजे. तुम्हाला जर कोणी प्रश्न करेल तर मग अशावेळी तुमचा प्रतिप्रश्न असा असावा की समोरच्याचे ताँड बंदच झाले पाहिजे.
आपली हशारी वाढवत रहा. हुशार प्रश्न पडत जातील मग ते हुशार प्रश्न विचारत चला. ते सोडवत चला. ज्याला ज्याला हुशारीचा प्रश्न पडला तो आपल्या अक्कल हुशारीने सोडवतो आणि यश मिळवतो. साधारण माणसाला प्रश्न पडतो की हे असे का? ते असे का? पण हुशार माणसाला प्रश्न पडतो तो असा की हे असं का झालं? हे कसं बदलता येईल? आणि त्यासाठी मला काय करावे लागेल? इत्यादी.
तसेही हुशार माणसालाच प्रश्न पडतात आणि प्रश्न ज्याला पडतात तोच हुशार असतो. ज्याला कधी प्रश्न पडतच नाही तो आयुष्यात कधी उभाच राहत नाही. तो हलाखीचं आणि गुलामीचं जगणं पसंत करतो. परंतु हुशार माणसाला प्रश्न पडतो आणि तो त्याचा सर्वांगीण विचार करून तो प्रश्न सोडवतो आणि स्वतंत्र जीवन जगतो. आयुष्यात यशस्वी होतो.
“तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा तुमची सुटका झाल्याशिवाय राहत नाही.
तुम्ही दुसऱ्याला प्रश्न विचारा तुम्ही त्याला अडकवल्याशिवाय राहत नाही.”
याला म्हणतात हुशारीचा प्रश्न विचारणं किंवा सोडवणं.
राजमाता जिजाऊंची ही शिकवण महाराजांनी मिर्जाराजे जयसिंह यांच्याशी संवाद साधताना वापरली, उपयोगात आणली. तुम्ही राजपूत असल्याचा तुम्हाला अभिमान नाही का? मग तुम्ही मोगलांची चाकरी का करता? आता आला का प्रश्न बरोबर वर्मावर. तुम्ही स्वाभिमानी असाल तर मोगलांची चाकरी करू नका म्हणजे आपला संघर्ष होणारच नाही. तुम्ही शंकराचे भक्त आणि मीही. मी स्वाभिमानी मराठा तर तुम्ही स्वाभिमानी राजपूत. तेव्हा या देशात आपले राज्य एकतर तुम्ही उभे करा, दिल्लीच्या तख्तावर बसा आम्ही तुम्हाला मदत करू किंवा मग आम्ही आमचे स्वतंत्र राज्य उभे करत आहोत
बाला मोठा भाऊ समजून मदत तरी करू शकता? बोला मिर्जाराजे काय मंजूर आहे आपणाला ? दिल्लीचे तख्त की मराठ्यांचे स्वाभिमानी स्वतंत्र तख्त, हिंदवी लोकांचे राज्य.
आता दिल्लीच्या तख्तासाठी मोगलांमध्ये सतत खून-खराबा आणि हत्याकांडे व्हायची. ते बाप, भाऊ, मुलगा असे काही बघत नसत. तख्तासाठी रक्ताची उधळण ते सहज करत तेव्हा या भानगडीत आपण आणखी कशाला घुसा. त्यापेक्षा शिवाजीराजांना बाहेरून थोडाफार पाठिंबा दिलेला केव्हाही चांगला. आणि मग मिर्जाराजे जयसिंहाने वचन दिले की तुम्हालाही वाचवतो आणि तुमचे स्वराज्य सुद्धा. ज्या मिर्जाराजेला औरंगेजबाने शिवाजी राजे आणि त्यांचे स्वराज्य हे दोन्ही संपव असा आदेश दिला होता त्याच मिर्जाराजांकडून महाराजांनी आता हे वेगळेच कबूल करून घेतले. आलेल्या संकटाला मोठ्या हुशारीने संधीत बदलवलं आणि मिर्जाराजे जयसिंहानाच ढाल बनवत महाराजांनी पुरंदरचा एक यशस्वी तह केला.
तेव्हा आपणही स्वतःला आणि इतरांना असे हुशारीने प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. प्रत्येक संकटाला प्रत्येक अडचणीला उत्तर हे असतेच. आपण फक्त हुशारीने प्रश्न विचारला पाहिजे. उत्तर शोधले पाहिजे आणि यश मिळविले पाहिजे.
****************************************************************************************************************************************************************************
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
