१३. वेगाने यश मिळविण्यासाठी काय करावे?
३) त्यावर नीट चिंतन करा-
आता तिसरी पायरी म्हणजे माहिती मिळाली ती नीट ऐकली ती नीट समजून घेतली आता त्यावर नीट चिंतन करा. चिंतन करा म्हणजे मिळालेली माहिती जर संधी देणार असेल तर त्याचा पुरेपुर फायदा उचलण्याची योजना बनवायला घ्या. मिळालेली माहिती जर धोक्याची सुचना असेल तर त्या धोक्याला टाळण्याची किंवा सामोरे जाण्याची योजना बनवा. कोणतीही योजना चिंतन न करता बनवू नका अन्यथा कृती करून देखील चिंता करावी लागण्याची वेळ यायची. तेव्हा कोणताही निर्णय घेताना आधी मनन, चिंतन, मंथन करा आणि मगच निर्णयापर्यंत या, चिंतन करणे म्हणजे प्राप्त स्थितीत अभ्यास करून Analysis करणे, विश्लेषण करणे आणि त्यानुसार पुढील ध्येय धोरण ठरविणे. प्राप्त स्थितीत पुढे जायचे की दोन पावले मागे येऊन मगच झेप घ्यायची याबाबत विचार करायचा. दोन पावले मागे येणे म्हणजे पराभव नसतो, कारण जेवढी लांब उडी मारायची असते तेवढेच
मागे येऊन मग जोरात धाव घ्यायची असते. तसेच दोन पावले पुढे जायचे म्हणजे विचारपूर्वक पाऊल टाकून मोक्याचे ठिकाणी थांबायचे. जेणेकरून संधीचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल.
प्राप्त स्थितीत युद्ध करायचे की टाळायचे की तह करायचा याचे नीट गणित मांडायचे आणि त्यानुसार चिंतन करून फायदा-तोटा याचे गणित समजून मगच पुढचे पाऊल टाकायचे. फायद्यात पडणारे पाऊल टाकणे म्हणजेच चिंतन आणि तोट्यात पाय टाकणारे धोरण म्हणजेच चिंता एवढाच फरक असतो यामध्ये. तेव्हा आपण नीट चिंतन मंथन करून निर्णय घेतला तरच यशापर्यंत जाता येते. विचारपूर्वक घेतलेला निर्णय यश मिळवून देतो तर विचार न करता किंवा अपूरा विचार करून घेतलेला निर्णय अपयशी ठरवतो म्हणून चिंतन करून निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
