१३. वेगाने यश मिळविण्यासाठी काय करावे?
४) योग्य तेवढं घ्या अनावश्यक ते टाळा-
विचार करून, चिंतन करून कृती करायची पण ते करण्यासाठी मिळालेली माहिती नीट पचवा. Digest करा. म्हणजे हवी ती माहिती घ्या आणि नको असलेली माहिती वगळा किंवा काढून टाका. जसं आपलं शरीर प्राप्त झालेल्या अन्नापैकी पोषक द्रव्य तेवढं पचवतं आणि नको असलेलं त्याज्य म्हणून बाहेर टाकतं. तसच आपणासाठी मिळालेल्या माहितीमधील योग्य कामाची, महत्त्वाची माहिती तेवढी घ्या आणि अनावश्यक ती माहिती वगळा. म्हणजे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टीवर फोकस करता येईल. महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देता येईल. थोडक्यात काय तर आलेली माहिती वेगवेगळी करा. Classify म्हणजे वर्गीकरण करा. आवश्यक काय आणि अनावश्यक काय ते ठरवा. म्हणजेच काय तर आलेली माहिती गाळून Filter करून घ्या. तेल काढा आणि चोथा बाहेर टाका, गर काढून घ्या आणि साल फेकून द्या. माहिती पचवताना नेमकी कोणती युक्ती वापरायची ते वेळ काळ प्रसंग पाहून ठरवा. यातील काही नमुने पाहून मग कोणत्याप्रकारे माहितीचे पचन व्हायचे ते नीट ठरवा. त्यासाठी खालील उदाहरणे नीट समजून घ्या.
१. पेढा – संपूर्ण खाता येण्यासारखा. काहीही त्याज्य नाही. संपूर्ण पेढाच तोंडात टाकता येतो. तसं कधी-कधी आलेली सगळीच्या सगळी माहिती महत्त्वाची असते. सगळी घ्या.
२. शेंगा – भूईमुगाच्या शेंगा फक्त आतील बी खाता येते. शेंगदाणे टरफल मात्र फेकून घ्यावे लागते. म्हणजे अनावश्यक माहिती गुंडाळली गेलेली. योग्य तेवढीच माहिती युक्तीने काढून घ्या.
३) आंबा – साल खाता येत नाही आणि बी-कोय ही खाण्याची वस्तू नाही. तेव्हा साल आणि कोय यामधील रस तेवढा काढून घ्या म्हणजे पहिली आणि शेवटची यातील मधील अचूक माहिती जी मध्येच दडलेली आहे ती नीट शोधून घ्या.
४) जांभूळ – यातील फक्त साल खाण्यासारखी असते. बी खाता येत नाही. काही माहिती अशी देखील असू शकते. तेव्हा यातील वरील साल तेवढी खाऊन घ्या आणि बी मात्र फेकून द्या.
५) फणस – यातील बी पण खाता येतात आणि त्यावरील गर देखील. परंतु साल मात्र खाता येत नाही. तेव्हा काही माहिती या प्रकारात मोडतात. तेव्हा त्यांचे बाबतीत पण असाच योग्य निर्णय घ्यावा लागतो.
आता सर्वच माहिती त्याज्य असेल तर मग त्या माहितीला माहिती तरी कशासाठी म्हणावे असा प्रश्न पडतो. असली माहिती तर कण्हेरीच्या झाडासारखी झाली. ना फुल उपयोगात येत, ना फांद्या कुठं कामाला येत,
ना पाने आणि मुळे तर जन्मतःच विषारी तेव्हा ती बागेत लावायचा काही संबंधच नाही. तेव्हा आपण जेव्हा माहिती म्हणतो तेव्हा ती माहिती उपयुक्तच माहिती असावी असा याचा अर्थ आहे. तेव्हा आलेल्या माहितीतीत आवश्यक तेवढी माहिती घ्या आणि अनावश्यक ती वगळून योग्य त्या माहितीवर आपले लक्ष केंद्रित करून तशी योजना बनवायला घ्या. आपली क्षमता, हातातील वेळ आणि प्राप्त माहिती यांचा ताळमेळ घालून मगच योजना बनवा म्हणजे ती नीट फलद्रूप होईल.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
