९९ .विजेता बना!

९९ .विजेता बना!

समाजकारणात अण्णा हजारे, महात्मा गांधी. राजकारणात नरेन्द्र मोदी, इंदिरा गांधी, शरद पवार. क्रीडा क्षेत्रात सचिन तेंडुलकर, विराट कोहली. अर्थकारणात धीरूभाई अंबानी, अदानी तर फिल्मी दुनियेत लता मंगेशकर अमिताभ बच्चन हे यशस्वी अर्थात विजेते झाले. कारण आपला जन्म कशासाठी झालेला आहे हे त्यांनी स्वतः लवकर ओळखलं. त्यांचे ध्येय पक्के होते. त्यांनी त्यांच्या क्षेत्राची धरसोड केली नाही. त्यांची अफाट कष्ट करण्याची तयारी होती. त्यांची आवड, त्यांची ताकद कशात आहे हे त्यांना लवकर समजले होते आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा १०१
टक्के सकारात्मक होता म्हणूनच ते विजेते झाले.

विजेता हा नेहमी आशावादी असतो. तो येणाऱ्या उद्याकडे पाहत असतो. तर पराजित हा निराशावादी आणि गेलेल्या काल-परवा कडे पाहत असतो. विजेता हा करून दाखवतो. तर पराजीत काही होण्याची, कोणीतरी करण्याची वाट पाहत असतो. विजेता हा स्वतःचे नशीब घडवितो, तर पराजीत हा ‘दे रे हरि खटल्यावरी’ असे म्हणून नशिबाला दोष देतो. विजेता हा धोके पत्करून त्यावर मात करतो. तर पराजित एखाद्या जुगाऱ्यासारखे धोके पत्करून देवावर भरोसा ठेवतो. असे म्हणतात Winner is always the part of answer, and Loser is always the part of problem. विजेत्याला आपली स्वतःची कमजोरी माहीत असूनही तो आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करतो. त्यावरच तो जोर देतो म्हणूनच तो विजेता ठरतो.

विजेता बनण्यासाठी जीवनाची पाच नीतिमूल्ये जरूर अमलात आणा.

१) बोलण्याआधी ऐकायला शिका.

२) खर्च करण्याआधी कमवायला शिका.

३) कृती करण्याआधी विचार करायला शिका.

४) हार मानण्याआधी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला शिका

५) मरण्याआधी मनसोक्त जगायला शिका.

तुम्हीही स्वतःला ओळखा, आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यातच उत्तम व प्रतिभावंत बना. तुमच्या क्षेत्रातील विजेता बना. तुमच्या क्षेत्रातील हिरोंना आदर्श मानून त्यांना फॉलो करा आणि जीवनात यशस्वी व्हा.

श्री. शिव खेरा एके ठिकाणी – जितनेवाले कोई अलग काम नहीं करते। वह हर काम अलग ढंग से करते है। और जितते है। तुम्हीही तुमच्या क्षेत्रातील तुमचे काम जरा हटके करा व जीवनात यशस्वी व्हा.

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!