१५.आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.
२) लक्ष नेहमी आठवणीत राहील याची दक्षता घ्या.
यासाठी अशी काहीतरी यंत्रणा किंवा पद्धत बनवा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या ध्येयाची सतत आठवण राहील. Set an unusual Reminder mechanism
इतरांपेक्षा वेगळी आणि अशी प्रभावी पद्धत वापरा की तुम्हाला तुमचे लक्ष सतत आठवणीत आले पाहिजे. तुमचे लक्ष कधीही विस्मरणात जाणार नाही याची काळजी घेण्यासाठीच अशी यंत्रणा उभी करा. आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक भागच समजा म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला आपणाला आपले ध्येय सतत लक्षात राहील. यासाठी अनेक उपाययोजना करता येतील आणि त्या अत्यंत कल्पक अशा देखील असू शकतात. तुम्ही तुमच्या कपड्यावर, घडाळ्यावर, गाडीवर, घरातील भिंतीवर असे कोठेही किंवा सर्वत्र ते लिहून ठेवू शकता. त्याचे चित्र रेखाटू शकता किंवा एखादे चिन्ह करवू शकता जे तुम्हाला सतत तुमच्या ध्येयाची आठवण करून देत राहील. तुमचे ध्येय तुमच्याही लक्षात राहीले पाहिजे आणि तुमच्या सोबत काम करणान्या लोकांच्या देखील. सर्वांचा एकच घ्यास एकच श्वास असेल तर मग जगातील कोणतेही ध्येय प्राप्त करणं अशक्य नाही. जे कल्पना करता येत त्याचा विचार करता येतो आणि ज्याचा विचार सतत केला जातो तेच आपल्या स्मरणात राहते आणि जे स्मरणात राहते ते सरणावर जाण्याअगोदर कोणत्याही परिस्थितीत प्राप्त करता येते.
शिवाजी महाराजांनी आपले ध्येय कायम डोळ्यासमोर राहावे म्हणून राजमुद्राच कोरली आणि तीच मुद्रा ते प्रत्येक कागदपत्रांवर शिक्का म्हणून वापरत असत. वयाच्या १२ व्या वर्षापासूनच महाराज ‘छत्रपती’ हा शिका वापरत असत. महाराजांना तर दररोज कागदपत्रांवर शिक्का मारावा लागे. ती वाचला जायचा आणि ज्याला ते पत्र लिहिलं गेलं तिही व्यक्ती ते वाचायची असे ते दोनदा लक्षात ठेवले जाई
आपणाला आपले स्वराज्य शून्यातून निर्माण करून विश्ववंदिता करायचे आहे याची आठवण म्हणून रयत आणि मावळे त्यांच्या कपाळावर हळदीचा किंवा चंदनाचा पिवळा गोल टिक्का लावत असत. आणि प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे याची सुरूवात शून्यातून करायची किंवा केली याची आठवण म्हणून राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज हे दोघेही आपल्या कपाळावर चंद्रकोर कोरीत असत. आहे की नाही आपले ध्येय नेहमी नजरेसमोर आणि लक्षात ठेवण्याची एक साधी सरळ पद्धती. आपणही आपले ध्येय नेहमी नजरेसमोर रहावे यासाठी अशीच काहीतरी शक्कल लढवून अक्कल चालवून आपले ध्येय प्राप्त करता येणे शक्य आहे यावर दुर्दम्य विश्वास ठेवून ते प्राप्त करू शकता.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
