१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

७. जगात तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हे लक्षात ठेवा.

राजे तुमची जिंकण्याची प्रवृत्ती Winning Attitude कायम ठेवण्याचा हा दुसरा आणि शेवटचा मंत्र आहे. आपण अजिंक्य आहोत आणि आपणाला कोणीही हरवू शकणार नाही या भावनेने काम करा. परंतु नुसते हवेत तरंगू नका. तर आपणाला कोण-कोण हरवू शकतो आणि त्याची काय काय ताकद आहे, क्षमता आहे यांचा अभ्यास करा आणि त्यांच्या तोडीस तोड ताकद उभी करून ते आपणाला कधीही हरवू शकणार नाहीत अशी सरस ताकद कमवा. तुमच्याशी संघर्ष सुरू करण्यापूर्वी शत्रूने शंभरवेळा विचार केला पाहिजे अशी ताकद कमावली म्हणजे एक आत्मसंरक्षणाचा आत्मविश्वास तयार होतो आणि मगच आपण असे समजायचे की आपणाला जगात कोणीही हरवू शकत नाही.

     त्यासाठी आपण काय करायला हवे तर इतरांपेक्षा आधी विचार करा, इतरांपेक्षा वेगाने कृती करा आणि इतरांपेक्षा आधी निकाल लावा. हाच अजिंक्य होण्याचा मार्ग आहे. लोक ज्या गोष्टीचा विचार करू शक नाहीत त्या गोष्टीचा विचार करा, लोक जी गोष्ट सुरू करू शकणार नाहीत तीच गोष्ट सर्वात अगोदर सुरू करा. त्यामुळे साहजिकच तुम्ही नवनवीन गोष्टी, संकल्पना हाताळण्यात अग्रेसर राहता आणि म्हणूनच जग तुम्हाला कितीही प्रयत्न केले तरी हरवू शकणार नाही. तुम्ही अजिंक्य राहाल.

राजामाता जिजाऊंच्या या शिकवणुकीप्रमाणे शिवाजी महाराजांनी अजिंक्य असे सैन्य, बेलाग असे किल्ले आणि इतरांपेक्षा सरस घोडदळ, इतरांपेक्षा प्रगत हत्यारे आणि इतरांपेक्षा प्रबळ असे आरमार बनविले आणि याच तयारीच्या बळावर स्वराज्य अजिंक्य बनविले.

तेव्हा आपणाला इतर कोणी हरवू शकणार नाही या भ्रमात राहण्यापेक्षा इतर कोणी आपणाला कशामुळे हरवू शकतो या शक्यतांचा अभ्यास करून त्यावर मात करणे म्हणजेच जिंकण्याची प्रवृत्ती कायम ठेवणे. यासाठी एकच गोष्ट लागते आणि ती म्हणजे कायम सतर्कता. जर तुम्ही सजग, सतर्क असाल तर नेहमी आघाडीवर राहण्याची तयारी कराल आणि स्वाभाविकपणे मग त्या मजबूत तयारीच्या बळावर तुम्ही जिंकण्याची नेहमी शक्यता तयार होते. त्यातूनच तुमची जिंकण्याची प्रवृत्ती कायम होईल आणि मग जगात तुम्हाला कोणीही पराभूत करू शकणार नाही. अगोदर लक्ष द्या आणि मगच लक्षात ठेवा.

शिवाजी महाराजांना आयुष्यात जिकडे तोंड फिरवतील तिकडे यश
मिळत गेले याचे कारण एकच सतत तयारी करणे, सतत सतर्क सजग असणे, इतरांचे काय चालले आहे यावर बारीक नजर ठेवणे आणि नवीन विचार करून त्यावर त्वरीत कृती करणे असे काम करत गेल्यामुळे स्वराज्य दिवसेंदिवस सक्षम होत गेले आणि तसेच ते अजिंक्य देखील होत गेले. म्हणूनच २७ वर्षे संघर्ष करूनही मोगल आणि औरंगजेब मराठ्यांना हरवू शकले नाहीत. शेवटी औरंगजेब म्हातारा होऊन मेला पण मराठे आणि स्वराज्य अजिंक्यच राहिले. कारण एकच जिंकण्याची कायम प्रवृत्ती आणि आपणाला जगात कोणीही हरवू शकत नाही याचा आत्मविश्वास. आता तुमची बारी आली आहे असं काम करून दाखविण्याची. तुम्ही ते जरूर कराल याची खात्री वाटते.

“परिस्थिती कधीच समस्या निर्माण करत नाही, समस्या तेव्हाच निर्माण होतात जेव्हा परिस्थिती नीट हाताळता येत नाही.”

माणूस अपयशी तेव्हाच होतो जेव्हा तो अपयशाचा विचार करतो. आणि माणूस तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो यशाची तयारी करतो. जर तुम्हाला आयुष्यात कधीही पराभूत व्हायचे नसेल तर मग तुम्ही जिंकण्याची प्रवृत्ती म्हणजेच तयारी कायम ठेवा आणि सतत आपल्या विषयावरील पकड घट्ट करत चला. आपला पाया भक्कम करा आणि पहा मग जग तुम्हाला कितीही ताकद लावली तरी हरवू शकत नाही. तेव्हा डोक्यात सतत जिंकण्याचा विचार करा. हाताने कायम जिंकणारीच कृती करा. पायाने केवळ जिंकण्याच्या मार्गाने चला आणि वेळेचं भान ठेवून कृती करत चला यश तुमचेच आहे. फक्त करून तर बघा. जग जिंकण्याची तुमच्यात ताकद आहे अशी जाणीव स्वतःमध्ये निर्माण करा, तुम्ही जग जिंकल्याशिवाय कसे राहाल ? कारण तुमचा जन्मच जिंकण्यासाठी झाला आहे. you are born to win. तेव्हा जिंकत रहा आपले winning Attitude कायम ठेवा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!