१०८ निर्णय घ्या
यशस्वितेसाठी आवडीच्या क्षेत्रात काम करा किंवा काम करणाऱ्या क्षेत्रात यशस्वितेसाठी आवड निर्माण करा. कर्तृत्वान लोक निर्णय घेतात व घेतलेल्या निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करतात, म्हणून निर्णय घ्या. १०० टक्के लोकांना सर्व काही कळते पण वळते पण फक्त १० टक्के लोकांना. हेच १० टक्के लोक निर्णय घेऊन कर्तुत्वाने यशस्वी होतात. फक्त ज्ञान असून उपयोग नसतो तर निर्णय घेणे गरजेचे असते. सिगारेट पिणाऱ्याला सिगारेट ही शरीराला अपायकारक असते हे माहीत असते तरीही तो सिगारेट पितो. सायकल चालविण्याची
किंवा पाण्यात पोहण्याचे सर्व नियम पाठ असून उपयोग नसतो. तर त्यासाठी कृती करावी लागते. सुरुवातीला पोहताना नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय आपण चांगले पोहणार नाही. ९० टक्के लोक निर्णय घ्यायलाच घाबरतात म्हणून ते निर्णय घेतच नाहीत व निर्णय घेतला नाही तरी यश कधी मिळणार नाही. निर्णय घेतल्यावर अडचणी येणारच; पण त्या अडचणींवर मात करून यश मिळवायचेच हा दृढ संकल्प करा. म्हणूनच म्हणतात स्वप्न + निर्णय + कृती = यश, स्वप्न निर्णय फक्त टाईमपास. म्हणून स्वप्नावर विश्वास ठेवून निर्णय घ्या कृती करा. निर्णय हा ध्येयाकडे, हेतूकडे घेऊन जातो. ध्येय कृतीकडे नेते. कृतीमुळेच सवय लागते. सवयीमुळेच स्वभाव बनतो व स्वभावामुळे ध्येय प्राप्त होते. हे सर्व निर्णयामुळेच घडते म्हणून निर्णय घ्यायला घाबरु नका व जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
