जडणघडणीचा काळ : जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

जडणघडणीचा काळ :

जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

अपघात झाला आणि जन्मखूण मिळाली

माझे आजोबा भी आधी सांगितल्याप्रमाणे अनेक कामांत तरवेज होते. आमच्या गावात त्या काळी एकव माडीवाले (दुमजली) घर होते. परंतु त्यांची माही पत्र्याची होती. गावात बहुतेकांचे वाडे होते ते चिरेबंदी दगडांचे व एकमजली. माडी बांधायची, तरी जरा कष्टाचेन व पैशाचेच काम होते. आजोबा व वडिलांना वाटले, आपणही माही बांधावी, आमचा वाडा चिरेबंदी दगडांचा होता. माडी बांधायची पण ती पत्र्याची नाही, तर गर्डरची बांधायची व शहाबादी फरशी असलेली असावी असा आजोबांनी निश्चय केला. कधीही शाळेत न गेलेले माझे आओबा पण स्वतःच्या हिकमतीवर त्यांनी अशी गर्डरची (टी अँगल) माडी बांधण्याचा विडा उचलला. त्या काळात अशा कामांसाठी सिव्हील इंजिनिअरकडून आराखडा तयार करून घेणे, बांधकामासाठी कुशल कारागीर मिळणे तेही खेडेगावात दुरापास्तच होते. परंतु माझ्या आजोबांनी हे शिवधनुष्य स्वतःच उचलले. शाव्य शिकलेले नसले, तरी त्यांचा तोंडी हिशेब शिकलेल्यालाही तोंडात बोट घालायला लावणारा होता. पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी त्यांची शंभरपर्यंत तोंडपाठ होती. गणिती आकडेमोडीसाठी कॅल्क्युलेटरवर अवलंबून असलेल्या आजच्या पिढीला पायकी, दीडकीचे गणित कळणे तसे अवघडच आहे, पण माझे आजोबा त्यात पारंगत होते. तर त्यांनी गर्डरची माडी बांधण्याचे ठरविल्यानंतर अनुभवाने व अंदाजाने त्यांनी सर्व मोजमापे माझ्या वडिलांबरोबर चर्चा करून निश्चित केली. त्याप्रमाणे किती गर्डर आणायचे, काय मापाचे आणायचे, टी अँगल किती आणायचे, नटबोल्ट कसे बसवायचे, फरशी काय मापाची आणायची असा सगळा हिशेब केला. लोखंडी साहित्य आणण्यासाठी त्यांनी वडिलांना थेट मुंबईला पाठविले. तसेच फरशी आणण्यासाठी गुलबर्गाजवळील शहाबादला (कर्नाटक) धाडले. दोन्हीकडून दोन ट्रक भरून माल आमच्या गावात दाखल झाला. आमच्या शेतात आंब्याची चार मोठी झाडं होती. त्याखाली लोखंडाचा ट्रक रिकामा करून घेतला. टी अँगल गर्डरला भोक पाडण्यासाठी एक हँड ड्रील मशीन आणली. अशा रीतीने सर्व जामानिमा जमा झाल्यावर आजोबा व वडिलांच्या कामाला सुरुवात झाली. आम्ही भावंडेही माडी बांधण्याचा उत्साह असल्याने शाळेतून आल्यावर या कामावर यायचो. माझ्याकडे ड्रील मशीनने भोक पाडण्याचे काम होते. याच दरम्यान एक घटना घडली, ज्याची खूण आजही माझ्या कपाळावर आहे. मी बराचसा तापट स्वभावाचा असल्याने कोणतेही काम पटापट उरकण्यावर माझा भर असायचा. सतत कोणत्या तरी घाईत असल्याप्रमाणे माझे काम चालायचे. घाईगडबड, गोंधळ, धिंगाणा, दंगामस्ती असे माझे काम होते. त्या काळात शेतात काम करताना सतत मातीत पाय असल्याने चपला लवकर घासून सपाट होत. त्या लवकर झिजू नयेत व जास्त दिवस टिकाव्यात, यासाठी आमचे आजोबा चपलांना लोखंडाचे नाल ठोकत. जनावरांच्या खुरांना अशा प्रकारचे नाल ठोकण्यात येतात. तसे नाल आजोबांनी आमच्या चपलांना ठोकले होते. त्या नाल लावलेल्या चपलांमुळे गुळगुळीत पृष्ठभागावरून घसरायला होत असे. माझा असाच दंगामस्ती करीत काम करण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळी लोखंडी टी अँगलचा सापळा तयार झालेला होता. मी त्या टी अँगलवरून तोल सांभाळत चालायचा उद्योग करायला गेलो. माझ्या नाल असलेल्या चपलांमुळे माझा पाय घसरला व मी थेट टी अँगलवर आपटलो. त्या टी अँगलचे टोक माझ्या डोळ्यांच्या भुवयांच्या मध्ये घुसले. भळाभळा रक्त वाहू लागले. हातातले काम टाकून सगळे माझ्याकडे धावले. मला उचलून बाजूला केले. जखमेवर हळद टाकून मलमपट्टी केली. माझ्यावर रागावण्यापेक्षाही सर्वांना माझ्या जखमेची काळजी होती. डोळे वाचले यासाठी सर्वांनी देवाचे आभार मानले. काही दिवसांनी ती जखम भरूनही आली, पण त्याची खूण जन्मखुणेप्रमाणे माझ्या भुवयांच्या मधोमध आजही आहे. मी जायबंदी झालेलो असताना सर्वांनी झाडाखाली तयार झालेला लोखंडी सापळा खोलून तो आमच्या घरावर व्यवस्थित बसवून फिट केला व आमची माडी तयार
इाली. आम्हाला सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. आमचे माडीचे घर तेही टी अँगलचे आमच्यासाठी अनुपाचा तर काहीच्या असूयेचाही विषय ठरले.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!