मी मॅट्रिक झालो
“तू फस्स क्लास पास झालासी”
एकेक करून मी मॅट्रिकचे सर्व विषयांचे पेपर दिले, ईत्री तसेही माझे कच्चेच होते. त्यामुळे इंग्रजीला पेपर जरा असातसाच गेला, परंतु मी पास होईन, असे वाटत होते. निकालाची खात्री होती, पण मनात हुरहुरही होती. १६ जून १९७२ ला निकाल लागणार होता, तेव्हा निकाल पाहण्यासाठी बेट शाळेत जावे लागायचे. मला दादांनी (माझे वडील) “निकाल पाहण्यासाठी तू कपाला जाऊ नकोस.” असे सांगितले. “मी जाऊन निकाल घेऊन येतो.” असे ते म्हणाले. याला एक कारणही होते व माझी काळजीही होती. कारण त्या काळात मुळात मॅट्रिकचा निकाल अतिशय कमी लागत असे. पहिल्याच श्वत्नात पास होणे कोणाला माहितीही नव्हते. अशा वेळी निकाल वेगळा लागल्यास भी नाराज होऊन जिवाचे काही बरेवाईट करून घेईल की काय या शंकेपोटी दादांनी मला गावातच चांबायला सांगितले व ते स्वतः निकाल आणायला गेले, मी वडिलांचे ऐकले व निकालाच्या दिवशी आमच्या जरा लांबच्या रानात जनावरे घेऊन गेलो, दुपारी दादा व आमच्या घरचे मला शोधत रानात आले. दादांच्या व सगळ्यांच्याच चेहन्यावर आनंद दिसत होता, दादा म्हणाले, “नाना, अरे, तू फस्स क्लास पास झालास।” मला खूप आनंद झाला. माझे मोठे बंधूाही पास झाले होते. आमच्या घरासाठी तो दुहेरी आनंदाचा दिवस होता. दादांनी मी पास झाल्याच्या खुशीत पेढे आणले होते. त्यावेळी पहिल्यांदा मला वडील ‘नाना’ म्हणाले. एरव्ही ते मल्य ‘नवनाथ’ म्हणत असत व माझे भाऊ मला ‘नाना’ म्हणायचे. आईचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने माझ्यासाठी ‘महादेवाला साखरेची शेरणी चाटेन,’ असा नवस केला होता. वडीलही खुश होते. त्यांनी साखर नव्हे तर यात्रेला पेज्याची शेरणी चाटू, असे सांगितले, तोपर्यंत तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी आभी मांडवेश्वरापुढे पेवे ठेवले. नंतर घरात सगळ्यांना दिले. एवढेच नाही तर गावातही सर्वांना त्यांनी पेढे वाटले. त्या काळात पेढे वाटणे हा अत्यानंदाचा कळसच होता. कारण साधारणपणे गोड देणे म्हणजे गूळू असाच प्रथात होता. परंतु कडपामधील शाळेत भी फर्स्ट क्लास पास झाल्याचे शिक्षकांनी सांगितल्यावर दादांना अत्यानंद झाला होता, फर्स्ट क्लास म्हणजे काय, हे त्यांना कळत नव्हते, तरी मुलाने खूप मोठी मजल मारली, एवढे त्यांना नक्की कळाले होते. त्यांचा हा आनंद त्यांनी अशा रीतीने साजरा केला. मॅट्रिकला मला ६७ टक्के गुण मिळाले होते. गणितात १०० पैकी ९४ गुण होते. विज्ञानात १०० पैकी ८८ गुण होते. फक्त इंग्रजीने दगा दिला होता. मुळातच कच्च्या असलेल्या या विषयात मला फक्त ३५ गुण होते. म्हणजे मी जवळजवळ काठावर पास झालो होतो. माझे इंग्रजी जरा बरे असते व चांगले गुण मिळाले असते, तर सरासरी पाहता मी त्यावेळी मॅट्रिकला बोर्डात नक्की आलो असतो. तो योग नव्हता; पण मला आजही वाटते, इंग्रजीत त्यावेळी मी पास झालो, यामागे आमच्या ग्रामदैवताचा कृपाप्रसाद असावा. माझी स्वतःची महादेवावरील श्रद्धा व विश्वास आणखी वाढला.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
