मी मॅट्रिक झालो

मी मॅट्रिक झालो

रोजगार हमीवर काम

मी १९७२ ला मॅट्रिक पास झालो; पण हे वर्ष आणखी एका कारणासाठी फक्त माझ्याच आयुष्यात नाही, तर उभ्या महाराष्ट्राच्या आयुष्यात वेगळे होते. त्या वर्षी महाराष्ट्र भयावह दुष्काळाला सामोरा गेला होता. पावसाअभावी कुठेच काही पिकलेले नव्हते. सध्याही आपण मागील दहा-बारा वर्षात दुष्काळ पाहिले, पण त्यात केवळ पाण्याची टंचाई होती. ७२ च्या त्या दुष्काळात अन्नधान्याची टंचाई होती. खायलाच काही नव्हते. त्यामुळे सरकारने एक अभिनव योजना राबवून काम करणाऱ्या हाताला खायला द्यायला सुरुवात केली. रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ देशात प्रथम महाराष्ट्रात रोवली गेली. आज नरेगा योजना म्हणून ती केंद्राने स्वीकारली आहे. तर त्या काळात आम्ही सगळ्यांनीच रोजगार हमी योजनेवर काम केले आहे. दुष्काळामुळे सरकारने गावोगावी नालाबंडिंग व जलसंधारणाची कामे हाती घेतली व त्यावर रोजगार मिळवून दिला. या कामाचा मोबदला म्हणून खायला अन्न व थोडेफार पैसे मिळायचे.
आमचा भाग आधीच कायम दुष्काळी, स्यात तेरावा महिना अशी परिस्थिती होती. त्यामुळे आम्हालाही रोजगार हमी योजनेवर जाणे भाग होते. आम्हा मुलांसाठी या कामाचे आकर्षण होते ते म्हणजे सुकडी, सुकही म्हणजे गव्हाचाच एक भरड रूपातला प्रकार. त्या काव्ळात सरकार गावोगावी अशा सुकडीचे वाटप करायचे. आम्ही नालार्बडिंगच्या कामावर जायचो, हे काम खूप कष्टाचे होते. उन्हातान्हात हे काम चालायचे. यात कोडी खोदणे हा प्रकार होता. मुकादम सकाळीच कामाच्या ठिकाणी आखणी करायचा. आम्ही मातीच्या खडकाळपणाचा अंदाज घ्यायचों व कामाच्या ठिकाणी भल्या सकाळीच पोहचून आमची कोल्या खोदण्याची जागा निवडायचो. या कामामुळे मिळणाऱ्या सुकडीची आम्हाला प्रतीक्षा असायची. सुकही कच्ची खाल्ली, तर जरा वेचय लागायची पण पाण्यात शिजवून चोडा गूळ टाकला, तर अगदी शिऱ्यासारखी गोड लागायची. आम्ही त्याचा खूप आस्वाद घेतला. ७२ च्या त्या दुष्काळातील कोड्या खोदण्याचे काम व सुकडीची आठवण आजही मनात कायम आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!