उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला

पहिली कमाई

दोन दिवसांनंतर वडिलांनी सांगितले, “बेलगावला एका शेतक-याची बारा एकर जमीन आहे. त्याला ट्रॅक्टरने नांगरणी करायची आहे. पण आपल्याकडं ड्रायवार नाही.” मी महणालो, हायव्हरची गरज नाही. मी जातो ट्रॅक्टर घेऊन.” वडिलांनी परवानगी दिली व गावातीलच भाऊसाहेब सुतार या मुलाला बरोबर घेतले व बेलगावला गेलो. सायंकाळी आम्ही तिथे पोहचलो. शेताची पाहणी केली व लगेचच कामाला सुरुवात केली. रात्रभर मी ट्रॅक्टर दामटत होतो. सकाळी उजाडेपर्यंत सगळे शेत नांगरून झाले. त्यावेळी ट्रॅक्टरनं नांगरणीचा दर ऐंशी रुपये एकर होता. आमच्या कामाचे ९६० रुपये झाले व इतर किरकोळ रक्कम धरून एक हजार रुपये मला मिळाले. ती माझ्या आयुष्यातील पहिली कमाई होती. मला खूप आनंद झाला. रोकड एक हजार रुपये घेऊन मी सकाळी घरी आलो. रात्रीतून झालेली ही कमाई सगळ्यांसाठीच अप्रूप होती. मी पैसे आईकडे दिले व महादेवाचे आभार मानण्यासाठी मंदिरात गेलो. १९७८ मधील ते एक हजार रुपये म्हणजे आजचे साधारण लाखभर रुपये असावेत. त्या पहिल्या कमाईची आठवण आजही मनाला आनंद देते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!