बँकेचे पत्र : नोकरी की जप्ती ?

बँकेचे पत्र : नोकरी की जप्ती ?

बँकेकडून पत्र आले. पोस्टमनने विचारले, “नवनाथ कोण आहे? त्याच्या नावाने बँकेच्या जप्तीची नोटीस आहे. त्याने कर्ज काढलं असेल, आता तुमच्या जमिनीवर जप्ती येणार.” वडील हादरले होते.

आमच्या घरात ट्रॅक्टर आला व शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे एक वेगळे साधन आम्हाला मिळाले माझे बोरले बंधू बी.ए. झाले असले, तरी त्यांनी आपली शेतीवाढीच बरी म्हणून ट्रॅक्टर शिकून घेतला. आमच्याकडील ट्रॅक्टरने आम्ही इतरांच्याही शेतात नांगरणी करून द्यायचो. मी आपला परत लॉसाठी औरंगाबादला आलो. यादरम्यान मला औरंगाबाद एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजकडून कॉल आला. त्यानुसार मी त्यांच्या कार्यालयात गेलो. तिथे माझ्यासारखीच पंचवीस एक मुले आलेली होती. कार्यालयात आम्हाला सांगितले, “स्टेट बैंक ऑफ इंडियात कॅशियर पदासाठी भरती होत आहे. त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता योग्य असून लेखी व तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला या बँकेत नोकरी मिळू शकते.” त्यानुसार आम्ही आमचे अर्ज भरून दिले. लेखी परीक्षा पुण्याला होणार होती. माझा नंबर आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये आला होता. त्यावेळी मी प्रथमच पुण्याला गेलो. परीक्षा दिली व परत औरंगाबादला आलो, लेखी परीक्षेला देशभरातून मुले बसली होती. त्यात मेरिटनुसार फक्त दोनशेच्या आसपास मुले निवडली जाणार होती. मी अर्ज भरताना गावाकडचा पत्ता दिला होता. कारण औरंगाबादमध्ये यदाकदाचित पत्र मला मिळाले नाही, तर संधी जायची. तीन-चार महिन्यांनी एके दिवशी परीक्षेचा निकाल आला व माझी निवड झाली. जवळपास वीस हजार उमेदवारांमधून माझी निवड झाली होती. पण हा निकाल माझ्यापर्यंत पोहचताना एक मोठीच गंमत झाली. तो प्रसंग आजही आठवला की, हसूही येते आणि कधीकधी ग्रामीण भागातील अशिक्षितपणाचे वाईटही वाटते.

तर झाले असे की, मी बँकेच्या अर्जात गावाकडचा पत्ता दिला होता. त्यामुळे माझी निवड झाल्यावर बँकेकडून मला गावाच्या पत्त्यावर पत्र आले. ‘मु. मांडवा, पो. बेलगाव, ता. आष्टी’ या पत्त्यावर आलेले ते रजिस्टर पत्र म्हणजे बँकेची ऑर्डर होती. त्या काळात आम्हाला रजिस्टर पत्र सहसा येतच नसे. साधे पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र यायची. त्यामुळे रजिस्टर पत्र आल्यावर पोस्टमन संबंधिताला निरोप पाठवायचा व पोस्टात येऊन ते पत्र घेऊन जायला सांगायचा. आमच्या शेजारील गावातील पोस्टमन चौथी शिकलेला व पायाने अधू होता. त्याने माझ्या वडिलांना निरोप पाठविला. तो निरोप माझ्या वडिलांपर्यंत आठवडाभराने पोहचला. मधल्या काळात रजिस्टर पत्राची मुदत संपत आली होती. ठरावीक काळानंतर ते एक तर संबंधित माणसापर्यंत पोहचवावे लागे किवा परत पाठवावे लागे. त्यामुळे तो पोस्टमन सायकल दामटत माझ्या वडिलांना शोधत शेतावर आला. एक तर पायाने अधू आणि त्यात एवढी सायकल मारायला लागल्याने तो आधीच वैतागला होता. तो वडिलांना चिडूनच म्हणाला, “बाबूराव, तुम्हाला किती निरोप दिले, तुम्ही का आला नाहीत?” वडील म्हणाले, “तुमचा निरोप मिळाला नाही. मिळाला असता, तर लगेच हजर झालो असतो. काय काम आहे?” त्यावर पोस्टमनने सांगितले, “तुम्हाला इंडिया बँकेची नोटीस आली आहे. सही, अंगठा द्या व सोडवून घ्या.” “कशाची नोटीस?”
असे विचारल्यावर त्याने सांगितले, “गवनाव कोण आहे? त्याच्या नावाने बँकेच्या जपत्रीची नोटीस आहे. त्याने कर्ज काढलं असेल, आता तुमच्या जमिनीवर जप्ती येणार” सहौल हादरले होते, त्यांनी ते पत्र घेतले व विचारात पडले, पत्र मिळाले, तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यांची रात्र चितेत गेली. सकाळी उठताच त्यांनी सायकल घेतली व ते बेट आहीरा पोहचले. त्या काळात ग्रामीण भागात स्टेट

बैंक ऑफ इंडियाला इंडिया बायकलर स्टेट बैंक ऑफ हैदराबादला नुसतेच ‘हैदराबाद बँक’ म्हटले जायचे माझे वडील चितेतच आष्ट्रीतील स्टेट बँकेच्या दारात सकाळी नऊ वाजताच जाऊन पोहोचले. वॉचमनने त्यांना पाहिले व ‘अजून बँक उघडायची आहे,’ असे सांगून तिथून पिटाळून लावले, वडील विचारे जरा लांब जाऊन बँकेच्या आसपासच घुटमळत उभे राहिले. बरोबर साडेदहारा बैंक उघडली, से बेट बँकेच्या मैनेजरकते गेले व वाकून नमस्कार केल्या. मॅनेजरने विचारले, “काय म्हणला, बाबा?” वडील त्यांना म्हणाले, “साहेब, आम्ही पाटील माष्णर्स, इज्जतदार आहोत. तुमची आहोत. तुमची है न पै चुकती करू, पण जमिनीची जप्ती करू नका. आमच्या पोरानी काही तरी घोटाळा केल्ला. पण आम्ही तो निस्तरू, काहीही करा, हात जोडतो. पाया पडतो, पण जप्ती करू नका.” मॅनेजर या बोलण्याने चक्रावून गेले. त्यांना काहीच कळेना. त्यावर वडिलांनी त्यांच्यासमोर सीलबंद लिफाफा सादर केला. त्यांनी तो फोडला व वडिलांना विचारले, “नवनाथ कोण आहे?” वडील म्हणाले, “माझा मुलगा आहे. साहेब, लई हुशार आहे. औरंगाबादला शिकायला पाठविलं आहे त्याला आणि त्यानेच ही काशी केरली बघा.” मॅनेजर वडिलांना म्हणाले, “अहो बाबा, काशी, जप्ती वगैरे काही नाही. तुमच्या मुलाला नोकरी लागली आहे, त्याची ऑर्डर आहे. आमच्याच बँकेत तुमचा मुलगा साहेब म्हणून नोकरी करणार आहे. त्याला

औरंगाबादच्या मेन शाखेत रुजू व्हायचं आहे.” हे ऐकल्यावर वडिलांचा जीव भांडयात पडला. इतका आनंद झाला की, डोळ्यातून घळाघळा पाणी आले. ते बाहेर दुकानात गेले. पावशेर पेथे आणून बँकेत सगळ्यांना वाटले, मुलगा नोकरीला तेही इंडिया बँकेत लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, त्यांनी सायकल घेतली व परत गावात आले. महादेवाला पेढे ठेवले.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!