व्यवसायाचे बीजारोपण

व्यवसायाचे बीजारोपण

संघी आली चालून

माझे मामेसासरे स्व. लक्ष्मणराव चोभे यांच्या रूपाने मला माझ्या स्वप्नांच्या दिशेने नेणारी एक संधी चालून आली. परंतु त्यातही मोठी गंमत झाली. चोभेमामा यांचे नगरला चहा, तंबाखूचे दुकान होते. ते एके दिवशी माझ्याकडे औरंगाबादला आले. मी बँकेत असल्याने दुपारी जेवणाच्या सुटीत ते मला भेटले. ते म्हणाले, “बँक सुटल्यावर काय करणार आहात?” मी म्हणालो, “काही नाही, घरी जाणार आहे.” ते म्हणाले, “ठीक आहे, मग आपल्याला संध्याकाळी एका मीटिंगला जायचं आहे. कार्तिकी हॉटेलला मीटिंगसाठी नागपूरहून काही साहेबलोक आले आहेत. त्यांना आपल्याला भेटायचं आहे.” मी काही जास्त विचारले नाही, पण त्यांना सांगितले की, “तुम्ही पुढे जा, मी मागून येतोच.” ते गेल्यावर मी विचार केला, ‘बँकेतच दिवसभर काम करून दमायला झालंय, आता परत कुठे जायचं मीटिंगला?’ मी आपला सरळ घरीच जाण्याचा बेत ठरविला. सायंकाळी बँक सुटली व मी बाहेर आलो. पाहतो तर हे महाशय बँकेच्या दारातच माझी वाट पाहत बसून होते. त्यामुळे मग माझा नाइलाज झाला व मी त्यांच्याबरोबरच मीटिंगला गेलो. तीन तास मीटिंग ऐकली. बिझनेस प्लॅन समजला. खूप पैसे मिळू शकतात, असेही वाटले. आपण श्रीमंत होऊ शकतो, विमानात बसण्याचे, यशस्वी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो, असेही मनाला वाटू लागले. पण त्या मीटिंगमध्ये जे काम करायला सांगितले होते, ते जरा वेगळे होते. लोकांकडून पैसे आणायचे व ते एका खासगी कंपनीत जमा करायचे होते. माझ्या मनात रकिची पाल चुकचुकली, मीटिंगमध्ये सांगितले, ते चांगलेच आहे. पण उद्या ही कंपनी बुडाली, लोक पळून गेले, तर आपण जमा केलेल्या लोकांच्या पैशांचे काय होईल? लोक आपल्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवणार. उद्या त्यांचे पैसे बुडाले, तर आपली किती इज्जत जाईल? लोक नावे ठेवतील.

मामेसासऱ्यांनी विचारले, “काय करणार?” मी बेट ‘नाही’ म्हणण्याऐवजी “पाहू, विचार करून सांगतो” एवढेच म्हणालो. ते नगरला परतले. पुन्हा पंधरा दिवसांनी ते दत्त म्हणून माझ्याकडे बँकेत हजर. परत त्यांच्याबरोबर मीटिंगला गेलो, मीटिंगमध्ये पुन्हा तेच. याने इतके लाख मिळविले, त्याने अशी नेत्रदीपक कामगिरी केली. मी मामेसास-यांना विचारले, “तुम्हाला मिळाले का इतके पैसे?” ते म्हणाले, “अजून नाही मिळाले, पण लवकरच मिळतील.” मीटिंगमध्ये नागपूर, कोलकाता अशा लांबच्या मंडळींना लाखो रुपये मिळाल्याचे सांगितले होते. मी विचारले, “या सगळ्यांना तुम्ही प्रत्यक्ष कधी भेटला आहात का? त्यांच्याशी बोलला आहात का? नसेल तर तुम्ही या सांगण्यावर विश्वास कसा ठेवता ? हा सगळा सांगोवांगीचा कारभार दिसतोय. मला पुरावा दाखवा मगच मी विचार करेन.” ते गप्प बसले व नगरला निघून गेले. असेच पंधरा एक दिवस गेले व ते पुन्हा औरंगाबादला आले. पुन्हा आम्ही मीटिंगला गेलो. तिथे आम्हाला ज्यांना पैसे मिळाले, त्यांच्या धनादेशाच्या, पासबुकाच्या झेरॉक्स दाखविल्या, मग मलाही पटले, किमान पैसे तर मिळतात. पण पुन्हा मनात शंका आली. लोकांच्या पैशांची गॅरंटी काय? उद्या कंपनी बंद पडली, पळून गेली, तर? मामेसासरे म्हणाले, “कंपनी पत्रास वर्षांची आहे. चांगली चाललेली आहे.” मी विचारले, “आतापर्यंत ज्यांनी पैसे गुंतवले, अशा किती लोकांना पैसे व्याजासकट परत मिळाले आहेत, याची आकडेवारी आहे का?” ते म्हणाले, “मला माहिती नाही, पण सर्व माहिती घेऊन सांगतो.” ते पुन्हा पंधरा दिवसांनी माझ्याकडे आले, त्यांनी काही कागदपत्रे पुरावे म्हणून आणली होती. एवढे होऊनही माझे काही समाधान होत नव्हते. मी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत होतो. ते जायचे व काही दिवसांनी पुन्हा उत्तर घेऊन यायचे. शेवटी त्यांनी त्या कंपनीकडून बँकेचे एक पत्रच आणले. त्या पत्रात बँकेने स्पष्टपणे लिहिले होते की,’ लोकांची जमा रक्कम ही फक्त त्याच लोकांना परत करण्यासाठी काढण्याचे अधिकार कंपनीचे चेअरमन व संचालकांना आहेत. ते पैसे चेकने थेट बचतदाराच्या खात्यातच जमा केले जातात. इतर कोणत्याही कामासाठी पैसे काढण्याचे अधिकार कंपनी चालकमालकांना नाहीत.’ या सर्व रिझर्व्ह बँकेच्या अटी होत्या. ते पत्र पाहिल्यानंतरही माझ्या मनातील शंका दूर झाली नाही.

मी त्या पत्राच्या आधारे रिझर्व्ह बँकेतील एनबीएफसी (नॉन बैंकिंग फायनान्शियल कंपनी) डिपार्टमेंटला पत्र लिहिले. लोकांच्या पैशाच्या सुरक्षेसंबंधी. एक महिन्याने मला आरबीआयकडून उत्तर मिळाले. कंपनीने जे काही सांगितले होते, ते खरे असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. माझे समाधान झाले. मात्र या सर्व शंकानिरसनात नऊ महिने उलटले होते. बरीच चिकित्सा केल्यानंतर मी त्या कंपनीचा एजंट होण्यास तयार झालो. मी बँकेचा नोकर असल्याने मला स्वतःला एजंट होता येत नव्हते. त्यामुळे मी पत्नीच्या नावावर एजन्सी घेतली. ती कंपनी म्हणजे ‘पिअरलेस जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लि.’ कंपनीचे कांर्यस्वरूप बचत व विमा असे होते. मुख्य कार्यालय कोलकाता. अशा त-हेने मी व्यावसायिक झालो.

एजंट होण्यासाठी पत्नीच्या नावाची आवश्यक पॉलिसी, फॉर्म वगैरे सगळे भरून दिले. आता मी त्या कंपनीचा एक भाग झालो होतो. त्यामुळे मीटिंगला नियमित जाऊ लागलो. मीटिंगमध्ये आमच्या या नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायाचे बारकावे समजून घेता आले. मला सांगितले गेले होते की, हा गुणाकाराचा व्यवसाय आहे. बेरजेपेक्षाही गुणाकाराची ताकद अफाट असते. विशेष म्हणजे या व्यवसायात पहिल्या रॅकलाच फक्त मागायचे म्हणजे थेट लोकांकडे जाऊन गुंतवणूक आणायचे काम करायचे असते. त्यानंतर दुसऱ्याला एजंट बनवायचे काम. तिसऱ्या रँकपासून तर फक्त सुपरव्हिजन करायची व मीटिंग घेऊन भाषण करायचे. इतरांना या व्यवसायात येण्यासाठी प्रेरित करायचे म्हणजे पहिल्या रंकला डायरेक्ट बिझनेस करायचा, दुसऱ्या रकल्प आपल्यासारखेच दहा एजेंट तयार करायचे. तिसन्या रकपासून अठराव्या रॅकपर्यंत फक्त सुपरव्हिजन व भाषणे करणी खूप पैसा देणारा, खूप मानसन्मान मिळणारा व्यवसाय असल्याने माझ्यातील महत्त्वाकांक्षा चांगलीच फुल्लाती सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी नोकरीही चालू होती. साईड विझनेस म्हणून मी यासाठी वेळ काडू शकत होती. नवीन असल्याने व्यवसाय कसा सुरू करावा, यायावत वरिष्ठांनी मार्गदर्शन केले होते. त्यांनी सांगितले होते, “आधी नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे अशा लोकांची यादी बनवायची. त्याचे ए, बी, सी असे वर्गीकरण करायचे. ए म्हणजे हक्काचे जे तुमच्या शब्दावर गुंतवणूक करायला तयार होतील, वी म्हणजे थोडे दूरचे नातेवाईक, ओळखीचे, मित्र वगैरे ज्यांना तुम्हाला थोडे जास्त पटवून द्यावे लागेल, तुम्ही जेव्हा एखादी वस्तु विकण्यासाठी लोकांकडे जाता, त्यावेळी तुमच्याकडे काही गोष्टी असणं आवश्यक असतं. त्यात ज्ञान, कौशल्य व दृष्टिकोन या गोष्टींचा समावेश असतो.” माझ्याकडे ज्ञान भरपूर होते. व्यवसायाचे कौशल्य मात्र नव्हते, कारण आधी कधी व्यवसाय केला नव्हता. परंतु आत्मविश्वास होता. समोरच्याला पटवून देण्यासाठी फाईल, कंपनीची व्यवस्थित माहिती, कागदपत्रे अशा गोष्टी होत्या. दृष्टिकोन म्हणाल तर तो प्रचंड सकारात्मक होता. त्या काळात भी सेल्स व मार्केटिंगची अनेक पुस्तके वाचली होती. अनेक भाषणे ऐकली होती. त्यामुळे स्वतःचा असा व्यवसाय सुरू करण्यासाठी मी जास्तच उत्सुक होतो. काही तरी भव्यदिव्य करायचे, नाव, संपत्ती मिळवायची. स्वतःचे वलय तयार करायचे, अशी जिद्द होती. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘वेल बिगिन इज हाफ डन.’ म्हणजे चांगली सुरुवात ही अर्धे यश असते, या अर्थाची. त्यामुळे मीसुद्धा व्यवसायाची सुरुवात अफलातून करण्याचे ठरविले. सुरुवातीला सगळ्यात छोट्या रकमेची म्हणजे १९ रुपये ७५ पैशांची जॉइनिंग पॉलिसी होती. माझा प्रमोशन कोटा होता सहा हजार रुपयांच्या प्रीमियमचा. मनातल्या मनात मी बिझनेसला केव्हाच सुरुवात केली होती. मनातच अनेकांना भेटलो होतो. त्यांच्याकडून गुंतवणूक करून घेतली होती. हे सगळे माझ्या मनात चालू होते. आता ते प्रत्यक्ष उतरवायचे होते. आणि मी पहिला ग्राहक डोळ्यासमोर ठेवून त्याच्याकडे गेलो.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!