२०. १००० पटीने विकास करा

२०. १००० पटीने विकास करा

६) प्रत्येक घटनेनंतर स्वतःला दोन प्रश्न विचारा.

१. मी जे केलं ते योग्य होतं का?

२. हेच मी अजून वेगळ्या प्रकारे करू शकलो असतो का?

तर शिवबाराजे एक हजार पटीत प्रगती करायला लावणारी ही सहावी पायरी होय. यात दोन प्रश्न आहेत जे प्रत्येक घटनेनंतर तुम्ही स्वतःला विचारले पाहिजेत. आपणाला कोणी विचारणारे असो नसो. आपण आपली स्वतःची जबाबदारी ओळखून प्रत्येक घटनेनंतर स्वतःला दोन प्रश्न विचारून सतत आपले आत्मपरिक्षण करायचे आणि आणखी नवीन काम कसं करता येऊ शकतं याचा विचार देखील करायचा. आपली बांधिलकी स्वतःशी असली पाहिजे आणि आपणच आपणाला उत्तर विचारले पाहिजे. तर यातील पहिला प्रश्न असा आहे की मी जे केलं ते योग्य होतं का?

जेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की हेच काम मी आणखी योग्य प्रकारे करू शकलो असतो का? याच आत्मपरिक्षण करायचं आणि स्वतःमध्ये आणखी काय सुधारणा करणे गरजेचे आहे ते समजून घ्यायचे. जेव्हा आपण आपले लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला आणखीन चांगल्या रितीने करता येते. त्यामुळे आपण आणखी लक्ष देऊन काम करायला पाहिजे होते का? आणखी आपण काय करायला पाहिजे होतं? याचे परत परिक्षण केले तर आपणाला कदाचित आणखी चांगला निकाल कसा मिळू शकला असता याचाही एखादा मार्ग सुचला असता.

दुसरा प्रश्न असा की आपण हेच काम आणखी वेगळ्या प्रकारे करू शकलो असतो का असा प्रश्न जर स्वतःला विचारायची सवय ठेवली तर मग आपोआपच आपण सकारात्मक सर्जनशील आणि प्रॉडक्टीव्ह बनत जातो. आपणाला जास्तीत जास्त प्रेरणा मिळते आणि आपण आणखी नवनवीन गोष्टी करण्यासाठी उत्साहाने तयार होतो. मागील अनुभवातून मिळालेल्या गोष्टी आपोआपच आपणाला पुढील कामात ते काम उत्कृष्ट रितीने करण्यासाठी कामी येतात. तेव्हा आपला प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी, अचूकता जाणण्यासाठी आणि आणखी उत्साहाने नवनवीन कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला हे दोन प्रश्न नेहमी विचारायचे आणि त्याचे योग्य ते उत्तरही स्वतःला द्यायचे. जर असे केले तर मग एक हजार पटीत प्रगती करताना काही अवघड वाटणार नाही किंवा काही आडवे येणार नाही.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

 

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!