२१. समाजाकडे मागे वळून पहा.
पुण्यातील मता बेगम पासून ते शिळीमकर अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. जेथे केवळ मानवता म्हणून महाराजांनी मोठी मदत केली आहे. १६६५ बालकराम तिवारी यास सनद दिली. १६७१ आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरास इनाम दिले. पाटगावच्या मौनीबाबांच्या पुरोहितांना १८ होनांचे वर्षासन दिले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधी जिर्णोद्धार ते जेजूरी अशीही कित्येक उदाहरणे सांगता येतील. महाराज जिकडे-तिकडे प्रवास करीत किंवा जिकडून तिकडून माणसे महाराजांना संपर्क करीत महाराज जिथे तिथे आपला हातभार लावत. आणि उत्तरप्रदेश ते खाली तामिळनाडू असा मोठा प्रदेश
आहे ज्यात महाराजांचे सामाजिक योगदान स्पष्टपणे दिसून येते. शिवाजी महाराजांचे सामाजिक योगदान एवढे मोठे की त्यांच्या हयातीतच सावित्रीबाई देसाई हिने महाराजांचे मंदिरच बांधले. आणि भारतातील अनेक मंदिरांमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा कोरली गेली. अगदी काशीविश्वेश्वर मंदिर यात समाविष्ट आहे. हा माणूस परमेश्वर नसेल परंतु परमेश्वरापेक्षा अजिबात कमी नाही याचा दाखलाच लोकांना मिळत गेला. महाराजांची कीती दिंगतरात पसरली ती अशी.
तसे पाहिले तर महाराजांना राज्याभिषेकावर एवढा खर्च करायचाच नव्हता. परंतु त्या निमित्ताने महाराजांना सामाजिक कार्य करणारांचा सत्कार आणि चांगले काम केलेल्या लोकांना मदत करायची होती आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या उदार अंतःकरणाने आणि सढळ हाताने दानधर्म केला. हा खर्च होता एक कोटी ४२ लाख होन. आजच्या भाषेत (१४२,००,००० x २४०,०००) एवढा खरं तर हा खर्च नव्हता, सामाजिक गुंतवणूक होती. लोकांच्या विचारात जो बदल घडवायचा होता त्याची ती किंमत होती. स्वाभिमानाने जगायचे आणि राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करायचे या शिकवणीसाठीची. असेच एकदा महाराजांनी जिजाऊ मातेला दुःखातून बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर येथे त्यांची सुवर्णतुला केली. इतर सतरा द्रव्य आणि संपत्तीने देखील तुला केली आणि ते सर्व पैसे, वस्तू, द्रव्य समाजकार्यासाठी अर्पण केले. अठ्यातही अगदी कैदेत असताना महाराजांचा दानधर्म चालू होता. नुसती मिठाईच वाटली होती ३६५ कोटी रुपयांची. महाराजांच्या मिठाईची गोडी अजून दिल्ली आग्यावाले विसरले नाहीत आणि विसरू शकत नाहीत. मौनीबाबा ते याकुतबाबा अशी सुद्धा कितीतरी उदाहरणे सांगता येतील. याकुतबाबा केळशी या ठिकाणचे. त्यांना महाराजांनी समाजकार्य करायला जागा दिली ६५३ एकर.
असे सर्वत्र महाराजांनी सामाजिक कामात मोठं योगदान दिलं आणि महाराजांची मनाच्या श्रीमंतीसोबत पैशांची श्रीमंती, राज्याची श्रीमंती वाढत वाढतच गेली. असे काम करून महाराजांनी पिढ्यान्पिढ्या पुरणारी पुण्याई जमा केली. यातूनच महाराजांचे नाव सामान्य लोकांच्या हृदयावर कोरले गेले ते कायमचेच. म्हणूनच महाराज कालही राजे होते आजही आहेत आणि उद्या चंद्र-सूर्य असेपर्यंत देखील राहतील.
यातून आपण शिकायचे एवढेच की पैसे कमावताना आपण त्यातील किमान १०% सामाजिक कार्याला दान करायचे. नुसते कुटुंबाचे पहायचे नाही तर संपूर्ण समाज हेच आपले कुटुंब समजून काम करायचे. सामाजिक कार्यांना हातभार लावायचा. लक्षात ठेवा जमा करत बसाल तर जमा होऊन बसाल. हा नियम न कळल्याने भारतात आज अनेक मोठमोठे राजकीय लोक तुरुंगात बसून आपले उरलेले पैसे नव्हे तर दिवस मोजत आहेत. हे कारागृहात जमा आणि यांनी कमावलेली संपत्ती सरकार जमा. बाकी पुण्याई काहीच नाही तेव्हा शिल्लक शून्य. आयुष्य वाया गेलं आणि म्हातारपण जेलमध्ये असे करू नये. असे होऊ नये यासाठीच थोडा समाजकार्याला हातभार लावत जा. तुम्ही म्हणाल असे केल्याने काय होईल तर यासाठी १९व्या शतकात घडलेली खरीखुरी गोष्ट सांगतो तिचा नीट अर्थ समजून घ्या. आजपासून कृती आपोआप कराल याची खात्री आहे मला.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv
