चौफेर घोडदौड

चौफेर घोडदौड

भेळभत्ता मीटिंग

मी चौथ्या पदावर पोहचल्याने कंपनीनं मला ४०० रुपये मार्केटिंग फिल्ड अलाउन्स सुरू केला होता. चारशे रुपयांचं पेट्रोल मिळू लागल्यानं माझी राजदूत एका जागेवर थांबायला तयार नव्हती. त्यावेळी पेट्रोल होते फक्त दहा रुपये लिटर राजदूतला मी मनसोक्त पेट्रोल पिऊ घातले. तीसुद्धा इतके पेट्रोल प्याल्यावर आनंदाने माझ्यासाठी धावायची. दुचाकीवरून मी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. तेही नोकरी सांभाळून. लातूर, नांदेड, नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर तसेच विदर्भात थेट अकोल्यापर्यंत जायचो. १९८३-८४ चा तो काळ होता. मला बिझनेसमध्ये मोठी झेप घ्यायची होती. रात्रंदिवस काम काम आणि काम. नवीन माणसे बिझनेसशी जोडायची. त्यांच्या कामाचा आढावा घ्यायचा. बाहेरगावी गेल्यावर बैठका घ्यायच्या. आमच्या बैठकाही काटकसरीतच व्हायच्या. हॉटेलमध्ये हॉल घेणे, जेवणावळी घालणे हे मोठे खर्चिक काम असायचे. आमचा जमही अजून बसायचा होता. त्यामुळे आम्ही व्यवसायाच्या बैठका शक्यतो मंदिर परिसरात घ्यायचो. दुपारच्या वेळी मंदिरांमध्ये तशीही गर्दी कमी असते. त्यात जरा गावापासून लांब असलेले मंदिर निवडायचो, म्हणजे तिथे मोकळे पटांगण मिळायचे. तिथे आमचे जेवण असायचे भेळभत्ता. जोडीला दोन दोन केळी, भेळभत्त्यात मुरमुरेच जास्त, शेवचिवडा नुसता नावापुरता. याचेही कारण म्हणजे मुरमुऱ्याच्या तुलनेत शेव महाग हेच होते. अशा बोटिंगमध्ये स्वीट डिशही असायची ती साखर व ओल्या नारळाच्या खोबऱ्याची हेनरी आम्ही वर्गणी जमा करूनच आणायचो. त्या त्या भागातील लोकांना येताना नारळ आणायला सांगायचो. अशी नारले जमा झाली की, आम्ही भी मंदिरात फोडायचो. नारळ फोडताना प्रत्येकजण मंकल्प करायचा टार्गेट पूर्ण करण्याचा, नारळ फोडून त्याने टार्गेटची जबाबदारी घ्यायची देवासमोर दिलेला तो शब्द पाळण्यासाठी मग सगळेच झटून कामाला वागायचे, असे दहा-पंधरा नारळ प्रत्येक मीटिंगला फोडायचे मग त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे, त्यात माखर मिक्स करायची. तोच प्रसाद स्वीट डिश म्हणून भेळमत्त्यावरोवर सगळ्यांना द्यावा असे आमचे जेवण आणि अशा आमच्या बैठका पुढे व्यवसाय यावल्यावर तसेच माझा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावर मोठमोठ्या हॉटेलच्या लाउंजमध्ये अनेक बैठका घेतल्या अगदी औरंगाबादच्या अजंता अॅम्बेसेडर अशा फरईक स्टार हॉटेलमध्ये जेवणामह या बैठका इशल्या पण त्या मंदिरातील मीटिंगची आठवण, भेळभत्ता व नारळ-साखरेच्या त्या स्वीट डिशची चव आजही जिभेवर रेंगाळते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!