कल्पक, द्रष्टा उद्योजक स्टीव्ह जॉब्स

कल्पक, द्रष्टा उद्योजक स्टीव्ह जॉब्स

असमाधानी राहा!

उद्योजक स्वभावानेच चौकटीच्या बाहेरील गोष्टींचा विचार करतात आणि अशाच गोष्टी पाहतात. एखादा प्रश्न, उत्पादन, किंवा कल्पना दिसली की आपोआपच आपल्या डोक्यात नावीन्य आणि कल्पकतेची चक्रे वेगाने फिरायला सुरुवात होते. कधीकधी आपल्याला या वैचारिक दृष्टीकोनाची इतकी सवय लागते की, तो वास्तवात किती अद्वितीय आणि मूल्यवान आहे, हेच आपण विसरतो. एखादी मोठी गोष्ट करताना बरेचदा लोक भौतिकदृष्ट्या आत्मसंतुष्ट होण्याच्या उत्कट इच्छेला बळी पडतात. यामुळे आपल्या प्रगती, यश आणि जीवनालासुद्धा उतरती कळा लागते. हे रोखायचे असेल, तर आपल्याला असमाधानी राहणं आवश्यक आहे. असमाधान हे दीर्घकाळासाठी आपल्याकडे जे आहे, ते पुरेसे आहे, असा विचार करू न देता आपल्याला आणखी मिळवण्यासाठी प्रोत्साहन देते. विवाहसंबंध असो, व्यवसाय असो किंवा तंत्रज्ञान उत्पादन असो, ही गोष्ट सर्वत्र सारखीच लागू होते. त्यामुळे जर किंवा जेव्हा हे असमाधान संपते, त्याचा पाठपुरावासुद्धा थांबतो आणि अखेरीस त्या विशिष्ट क्षेत्रात कमजोरी येऊन ती गोष्ट संपते. सामान्य भाषेत सांगायचे, तर कळत किंवा नकळत जर तुमची भूक संपली, तर तुमची आवड/रुची तुम्ही हरवून बसता आणि खेळ संपतो.

लेखक- अज्ञात (उद्योजक वक्ता)

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!