कल्पक, द्रष्टा उद्योजक स्टीव्ह जॉब्स

कल्पक, द्रष्टा उद्योजक स्टीव्ह जॉब्स

मूर्ख रहा!

वर्षावर्षाने मी जसा वाढत आहे, मला गोष्ट जाणवते की माझ्याकडून समाजाच्या असलेल्या अपेक्षासुद्धा जास्त उंचावत आहेत आणि जास्त अचूक होत चालल्या आहेत. ते दिवस गेले, जेव्हा अनुभव नसल्याने किंवा तारुण्याच्या जोशात अपयश स्वीकारले जात होते. आता जसा काळ पुढे जाईल, तसे सुरक्षित पावले उचलण्यावर आणि योग्य निवड करण्यावर खूप जोर द्यावा लागतो. इथे मूर्ख राहणं म्हणजे मूर्खासारखे वागणं नक्कीच नाही, तर इतरांना मूर्खपणाचा वाटणार्‍या किंवा दिसणार्‍या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची हिम्मत व धैर्य बाळगणे. आपले अंतर्मन, अंतर्ज्ञान व आपली स्वप्ने यांचा पाठलाग करा, मग ते इतरांना कितीका मूर्खपणाचे वाटेना. त्या पदवीदान समारंभात जॉब्स यांनी दिलेल्या भाषणातील त्यांचे शब्द आणि आवाजातील ध्यास हा सदैव प्रेरणादायी असेल. अ‍ॅपल कॉर्पोरेशनच्या स्वरूपात त्यांनी मागे ठेवलेल्या वारसामध्ये ही जरी एक आठवण असली, तरी बर्‍याच मनांवर ‘स्टे हंग्री, स्टे फुलिश’ हे चार शद्ब स्टीव्ह जॉब्स यांचं प्रतीक म्हणून कोरले गेले आहेत.

उद्योजकांसाठी संदेश : नवीन गोष्टी शिकत राहा. जास्तीत जास्त ध्येयांचा प्रचंड उत्साहाने पाठलाग करा. अल्पसंतुष्ट राहू नका. नेहमी कार्यक्षम राहा. इतरांची नाही तर स्वत:ची स्वप्नं, विचार जगा. आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकायला शिका. त्याचा पाठलाग करायची हिम्मत बाळगा.

लेखक- अज्ञात (उद्योजक वक्ता)

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!