ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय
बेरोजगारी वाढली आहे, तरुणांना काम नाही ही ओरड खरी असली तरीही ‘ईच्छा तेथे मार्ग’ हेही तेवढंच खरं आहे. आज झोमॅटो, अॅमेझॉनमध्ये पुष्कळ तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत आणि बर्यापैकी पैसे कमावत आहेत, हे ताजे उदाहरण आहे. मोठ्या शहरांमध्येच संधी आहेत आणि ग्रामीण निमशहरी भागात संधी नाहीत, हे म्हणणे ही तितकेसे बरोबर नाही. मी इथे तुमच्यासोबत एका खेड्यातल्या तरुणाशी झालेला संवाद, त्याने हेरलेली उद्योगसंधी, संधीचे केलेले सोने याबद्दल सांगणार आहे. खाजगी कंपनीत नोकरीत असताना आणि करीत असल्याने देशविदेश फिरलो, पण पर्यटन (यात्रा, सोशल टुरीझम किंवा फॅमिलीसोबत प्रेक्षणीय स्थळे पाहणे) करू शकलो नाही. एखाद्याला हे कारण सांगतोय, असे वाटणे साहजिक आहे, पण खाजगी क्षेत्रात जबाबदारीच्या पोस्टवर काम करणार्या लोकांना ही गोष्ट कळू शकेल.
कारण कुटुंबासोबत सिमल्याला जाऊन तासन् तास ग्राहकांचे कॉल्स् अटेंड करायचे किंवा हॉटेलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत बसायचे, ई-मेल्सना उत्तरे देत बसायची, ही काय मजा आहे का? पण हीच वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर सहलीला, यात्रेला किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेला असाल तर तुम्ही त्या वातावरणाशी तन व मन दोन्हींनी जोडले गेलात तरच मजा आहे, नाही तर ‘आहे उपचारा पुरता’ अशी अवस्था होते आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाचासुद्धा हिरमोडच करता.
केदारनाथ व बद्रीनाथ
काही दिवसांपूर्वी बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा करून आलो. या यात्रेदरम्यान एका मुक्कामात एका दिव्यांग तरुणाची भेट झाली. ३२-३३ वय असेल. पोलीओमुळे तो थोडा लंगडत होता. अशा अवस्थेतही तो केदारनाथसारख्या अवघड यात्रेला आल्याचे पाहून मला थोडे आश्चर्य वाटले म्हणून मी त्याला विचारले तर तो म्हणाला, हे माझं पाचवे वर्ष आहे.
लेखक- – एस. पी. नागठाणे (उद्योजक वक्ता)
7028963255
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
