यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!

यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!

हॉटेल सुवर्णम प्राईड

हॉस्पिटलनंतर २०१८ मध्ये आम्ही तारकपूरलाच मेन रोडवर ‘हॉटेल सुवर्णम प्राईड’ची मुहूर्तमेढ रोवली. नगर शहराच्या वैभवात भर घालणारी दिमाखदार आणि खरोखरच सोन्यासारखी वास्तू आम्ही उभारली. हॉटेल उभारणीवेळी मला माझी परदेशांतील भटकंती कामी आली. सुरुवातीपासून जे करायचे, ते पहिल्या क्रमांकाचे करायचे, हा माझा स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे परदेशांतील हॉटेलमध्ये जशी सेवा मिळते, लक्झुरियस सुविधा मिळतात, त्या सर्व सुवर्णम प्राईडमध्ये असल्या पाहिजेत असा माझा आग्रह होता. त्यानुसार आम्ही हॉटेलमधील सर्व अमेनिटी इंपोर्ट केली. थ्री स्टार, फोर स्टार दर्जाच्या सुविधा हॉटेलमध्ये उपलब्ध करून दिल्या. नगरमध्ये पूर्वी ज्या गोष्टी नव्हत्या, त्या आम्ही आमच्या हॉटेलमध्ये दिल्या. बार्बेक्यू, बिझनेस लाउंज, पाच प्रकारचे रेस्टॉरंट, रेस्टोबार, व्हेज नॉनव्हेजचे स्वतंत्र किचन, अठरा लक्झुरियस रूम्स, सुट्स आम्ही निर्माण केले. जैन फूड, इंपोर्टेड फर्निचर, मशिनरी, बैंक्वेट हॉल असे सर्व काही येथे आहे. दिमाखदार हॉटेल उभारताना सर्व दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिली. हे करताना आमचे दर हे नगरच्या संरचनेनुसारच ठेवले आहेत. याच सोयीसुविधांसाठी मोठ्या महानगरांत लागणारे दर आणि आमच्या हॉटेलमधील दर यात मोठा फरक आहे. त्यामुळेच अल्पावधीतच हॉटेल सुवर्णम प्राईडने मोठा नावलौकिक प्राप्त केला आहे. माझे दुसरे चिरंजीव महेश धुमाळ हॉटेलचे सर्व व्यवस्थापन पाहतात. आमच्या या हॉटेलचे उ‌द्घाटन मला माझ्या आईच्या शुभहस्ते करायचे होते. परंतु उद्घाटनापूर्वी सहा महिने आधी तिने ३१ ऑक्टोबर २०१७ ला कार्तिकी एकादशीला जगाचा निरोप घेतला. ही खंत आजही माझ्या मनात आहे. आम्ही हॉटेलचे उद्घाटन माझी सुविद्य पत्नी सौ. सुनंदा व माझे आदर्श असलेले सासरे दादासाहेब जाधव यांच्या हस्ते केले. सुवर्णम प्राईड हॉटेलनंतर आम्ही नगर शहरातच स्टेशन रोडवर जिल्हा बँकेच्या समोर एल. पी. जी. पंपही सुरू केला आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!