‘यशस्वी’ होणे म्हणजे काय?
- मला वाटते, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना, आपल्याला यश मिळावे यासाठी कायम देवाकडे प्रार्थना करणाऱ्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठीची तळमळ वाढत जाणे म्हणजे यशस्वी होणे.
- पैसे मिळविण्याचे बरेच चांगलेवाईट मार्ग असताना प्रामाणिकपणाने, मेहनतीने पैसे मिळविणे म्हणजे यशस्वी होणे.
- मनातील लोभ, अहंकार, मत्सर, भाऊबंदकी इत्यादी विचारांना मूठमाती देऊन मिळणाऱ्या सुखात आनंदी राहणे म्हणजे यशस्वी होणे.
- कालच्या झालेल्या चुका आज सुधारणे आणि पुन्हा त्या होऊच नयेत, याची काळजी घेणे म्हणजे यशस्वी होणे.
- आपण कोणासाठी तरी आदर्श असणे म्हणजे यशस्वी होणे.
- कालची गमावलेली वेळ आज वाया जाऊ न देणे म्हणजे यशस्वी होणे.
- समाजाने आपल्याला खूप चांगला माणूस म्हणून ओळखणे म्हणजे यशस्वी होणे.
- आयुष्यामध्ये मिळालेला प्रत्येक क्षण मनसोक्तपणे जगणे म्हणजे यशस्वी होणे.
- दररोज गोरगरिबांच्या, दुःखितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे यशस्वी होणे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
