कार्यारंभ करा, संघर्ष करा, श्रद्धा बाळगा…
आयुष्याची सुरुवात आपल्या रडण्याने व शेवट इतरांच्या रडण्याने होतो. मधला काळ असतो पुरुषार्थ दाखविण्याचा, यशासाठी स्वतःवर विश्वास ठेवा, संघर्ष करा, आत्मविश्वासाने कामाला लागा. कोणतीही गोष्ट करायची, तर त्याची सुरुवात करणे महत्त्वाचे असते. बरेच लोक यश, अपयश याबद्दल विचार करण्यातच वेळ घालवितात. शंकाकुशंका काढत बसलात, तर कार्याची सुरुवात होऊच शकत नाही. रामायणातील एक गोष्ट आहे.
राम-रावणाचे युद्ध संपले, रावण धारातीर्थी पडलेला होता. तो शेवटच्या घटिका मोजत असताना रामाने लक्ष्मणाला बोलावले व सांगितले, “तू जाऊन रावणाला भेटून ये, तो खूप ज्ञानी आहे, त्याच्या अनुभवाचा तुला फायदा होईल, काही तरी शिकायला मिळेल.” लक्ष्मण म्हणाला, “प्रभू तुमच्याइतका ज्ञानी, पराक्रमी कोणीही नाही. असे असताना त्या रावणाकडे मी कशाला जाऊ?” परंतु राम म्हणाला, “हा माझा आदेश आहे, तुला जावेच लागेल.”
रामाचा आदेश आल्यावर लक्ष्मण रावणाकडे गेला, त्याच्या डोक्याजवळ उभा राहिला, पण रावणाने डोळे उघडले नाही. त्यामुळे लक्ष्मण परत रामाकडे गेला. रामाला म्हणाला, “मी जाऊन आलो; पण त्याने लक्ष दिले नाही, काही सांगितलेही नाही.” त्यावर राम म्हणाला, “लक्ष्मणा, ज्याला कोणाला दुसऱ्याकडून काही ज्ञान, अनुभव घ्यायचा असेल; त्याने नम्रतापूर्वक, आदराने वागले पाहिजे. तू परत जा, रावणाच्या पायाजवळ नम्रपणे उभा रहा. हात जोडून त्याला विनंती कर. मग पहा काय घडते ते.”
लक्ष्मण परत गेला. रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला विनंती केली. तेव्हा रावणाने डोळे उघडले व प्रश्न विचारला, “अरे लक्ष्मणा, तू इथे कसा काय आलास?” लक्ष्मण उत्तरला, “मला तुझ्याकडे यायची अजिबात इच्छा नव्हती, तू किती नालायक आहेस, हे मला माहिती आहेच पण प्रभू रामचंद्रांनी आदेश दिला, म्हणून मी आलो.” त्यावर रावण म्हणाला, “अगदी बरोबर आहे तुझं. मी तुला काय सांगणार? परंतु प्रभू श्रीरामचंद्राने माझ्यावर विश्वास दाखविला आहे, त्यामुळे मी तुला काही तरी सांगणं भाग आहे. माणूस मरणपंथाला लागला की, कधीही खोटं बोलत नाही. मीसुद्धा तुला खोटं काही सांगणार नाही. माझा एक अनुभव सांगतो. माझा पराभव का झाला व आता माझी शेवटची इच्छा जी पूर्ण होणार नाही, तीसुद्धा सांगतो. मी महादेवाचा निस्सीम भक्त होतो. मी त्याला प्रसन्न करून घेतलं व वर मागितला की, मला स्वर्गात जायचं आहे. भगवान महादेव ‘तथास्तु’ म्हणाले.” तेव्हा लक्ष्मण मध्येच म्हणाला, “मग जा ना आता स्वर्गात.” तेव्हा रावण म्हणाला, “त्यासाठी आता खूप उशीर झाला आहे. देवाने मला शक्ती दिली होती, स्वर्गात जाण्यासाठी शिडी तयार करायची. पण मी म्हटलं, माझ्याकडे वर आहे, ताकद आहे, शिडी करायचं नंतर पाहू. शिडी करायचं काम सोडून मी सीतेला पळवून आणलं. या पापामुळे मी मृत्यूच्या समीप आलो आहे. लक्ष्मणा, मला एकच सांगायचं आहे की, तुम्हाला एखादी गोष्टी, एखादे काम करावंसं वाटलं ना, तर त्याची सुरुवात लगेन कराने उद्यावर, परवावर बकलू नका.” म्हणूनच महणतात ना, ‘कल करे तो आज कर, आज को हो अभी रावण पुढे म्हणाला, “प्रभू रामनंदाचा विजय व माझा पराभव होण्याचं एक कारण म्हणजे, रामाचा भाऊ त्याच्यावरीवर होता व माझा भाऊ मला सांभाळता आला नाही.”
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
