कार्यारंभ करा, संघर्ष करा, श्रद्धा बाळगा…
विश्वास ठेवा। श्रद्धा बाळगा।
यश मिळवण्यासाठी विश्वास व श्रद्धा या गोष्टींची नितांत गरज असते. एका डोंबाव्याने दोन उंच टॉवरता बांधलेल्या दोरीवर चालायला सुरुवात केली. हातातील काठीने तोल सांभाळून तो दोरीवर चालत होता, त्या वेळी त्याचा मुलगाही त्याच्या खांद्यावर बसलेला होता. खालून हजारो प्रेक्षक श्वास रोखून त्याची ही कला पाहत होते. अतिशय शांतपणे एक एक पाऊल टाकत डोंबारी दुसऱ्या टोकापर्यंत गेला. इकडे प्रेक्षकांनी टाळ्यांगा कडकडाट केला.
डोबाऱ्याने जमावाला विचारले, “तुम्हाला असं वाटतं का, मी आता असाच प्रवास करून उलट्या दिशेनेही जाऊ शकतो?” सगळे म्हणतात, “हो, आम्हाला पक्की खात्री आहे व विश्वासही आहे की, तुम्ही परत हे करू शकता. आमचा तुमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे. वाटलं तर आम्ही पैज लावायला तयार आहोत.” त्यावर तो डोंबारी म्हणाला, “ठीक आहे, मग तुमच्यापैकी कोणाचा तरी लहान मुलगा माझ्या खांद्यावर द्या, मी त्याला सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूपर्यंत घेऊन जातो.”
त्याने असे म्हणताच जमावात शांतता पसरली. कोणीही आपल्या स्वतःच्या मुलाला त्याच्या खांद्यावर देण्यास तयार झाले नाही. कारण डोंबाऱ्यावर सर्वांचा विश्वास होता, पण श्रद्धा नव्हती. विश्वास ठेवणे व श्रद्धा असणे वेगळे आहे. जेव्हा तुम्ही विश्वासाबरोबरच श्रद्धाही बाळगाल, तेव्हाच तुम्हाला खरे यश प्राप्त होईल.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
