आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग

आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग

‘रिलायन्स’चे सर्वेसर्वा : धीरूभाई अंबानी

माझे आणखी एक आदर्श म्हणजे धीरूभाई अंबानी. ‘रिलायन्स’ हे नाव माहीत नाही, असे बहुतेक भारतात कोणीच नसेल. तेही माहीत नसेल, तर ‘जिओ’ मोबाईल कार्ड तर प्रत्येकाला नक्कीच माहिती असणार. तरुणाई तर जिओवर जास्तच खूश आहे… आणि का नसणार.. त्यांना मोबाईलचा नेट डेटाच तितका मिळतोय. तर अशी ही कंपनी… देशाचे औद्योगिक धोरण ठरवितानाही सरकार रिलायन्सच्या मालकाशी चर्चा करते. रिलायन्स हा उद्योगसमूह नसून बँड बनला आहे. पेट्रोलपंपावर काम करणारी एक सामान्य व्यक्ती भारतासारख्या देशात महाकाय असे उद्योगसाम्राज्य उभे करते, ही काही फक्त नशिवाची गोष्ट नाही. मला एक आवर्जून सांगावेसे वाटते… अंबानींनी एवढे मोठे यश मिळविले. त्यातून ते मोठे झालेच. पण आणखी एक गोष्ट त्यांच्या यशाने
केली. ती म्हणजे त्यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून लाखो, कोट्यवधी रोजगार निर्माण केले. म्हणजे बधा, एक जण मोठा झाला की, अनेकांची मोठे होण्याची प्रक्रिया सुरू होते. याला म्हणतात खरे यश. आज फक्त विचार करून पहा, रिलायन्स उद्योगसमूह नसता तर…. आज त्या समूहात काम करणाऱ्या लाखो लोकांनी काय केले असते? वेगळा वाटला ना हा विचार. म्हणूनच मला अंबानी हे आदर्श म्हणून आवडतात. त्यांनी मोठे स्वप्न पाहिले व ते पूर्ण केले. हे करतानाच त्यांनी अनेकांना स्वप्ने पाहायला शिकविले. आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून असंख्य लोकांची स्वप्नपूर्ती केली.

धीरूभाई अंबानी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. शिक्षण म्हणावे तर मॅट्रिक फेल. पेट्रोलपंपावर वाहनांमध्ये इंधन भरणारा एक सामान्य कामगार त्याच पेट्रोल कंपनीचा मालक होण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठी सर्वस्व पणाला लावून ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ हे वाक्य प्रत्यक्षात उतरवितो. इहलोकाचा निरोप घेताना दोन मुलांसाठी ९० हजार कोटीचे साम्राज्य ठेवून जातो. हा खूप मोठा चमत्कार नाही तर काय आहे? मी धीरूभाईना कधी प्रत्यक्ष पाहिलेले नाही, भेटण्याचाही प्रश्न नाही. पण त्यांचे चरित्र, त्यांचे विचार माझ्या मनात खोलवर रुजले आहेत. ते मनात उमटले, तरी पेटून उठायला होते. धीरूभाई म्हणत, ‘If you want to be successful, then you have to put your heart in the field or in the business and that field, that business must be in your heart.’ या वाक्याचा मला समजलेला अर्थ म्हणजे, ‘जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचे हृदय त्या क्षेत्रात, त्या व्यवसायात ठेवावे लागेल, नव्हे ते क्षेत्र, तो व्यवसायच तुमच्या हृदयात ठेवावा लागेल’ हा पहिला मुद्दा व If you want to be successful, then you have to believe that my field, my business is the greatest thing in the world. ‘तुम्हाला यशस्वी व्हायची इच्छा असेल; तर तुम्ही एक विश्वास ठेवलाच पाहिजे की, मी जे काम करतोय, जो व्यवसाय करतोय तो जगातला सर्वात मोठा व्यवसाय आहे.’ अंबानींचे हे दोन मुद्दे मला प्रचंड भावणारे आहेत. तेच माझ्या व्यावसायिक जीवनात मी कायम लक्षात ठेवले. त्या दृष्टीने कायम वाटचाल करीत राहिलो. आणि विशेष म्हणजे यात मला यशही मिळाले. परमेश्वराने माझ्या कुवतीच्या एक हजार पट मला दिले. अंबानी म्हटले तर एक व्यक्ती, पण बारकाईने पाहिले तर यशस्वितेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!